आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पेशल डेस्क - फोटो हे आपल्या भूतकाळ आणि वर्तमानकाळाचा आरसा असतात. जे हजार शब्दांतून सांगता येणार नाही ते एका फोटोतून सांगता येऊ शकते असेही म्हटले जाते. पण काळाबरोबर कॅमेऱ्यांमध्ये बदल झाले, तसेच फोटोही बदलले. आता तर सेल्फीचा जमाना आला आहे. पण सेल्फीचा जमाना असला तरी काही असे विंटेज फोटो असतात जे आपल्याला कायम आपल्या भूतकाळाची आठवण देत असतात. 19 ऑगस्टला वर्ल्ड फोटोग्राफी दिनाच्या निमित्ताने divyamarathi.com भारताचे असेच काही रेअर फोटोज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे इतिहासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलून जाईल.
का साजरा होतो वर्ल्ड फोटोग्राफी डे...
- वर्ल्ड फोटोग्राफी डेची सुरुवात 1839 मध्ये डॉगेरोटाइप प्रोसेसच्या घोषणेने झाली होती. या फोटोग्राफी प्रक्रियेचा शोध जोसेफ नाइसफोर आणि लुइस डॉगेरोने लावला होता.
- काही महिन्यांनी 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रान्सच्या सरकारने या अविष्काराची घोषणा केली. ही जगातील पहिली फोटोग्राफी प्रक्रिया होती. त्या दिवसाची आठवण म्हणून वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा केला जातो.
2010 मध्ये झाली होती औपचारिक सुरुवात
- मात्र वर्ल्ड फोटोग्राफी दिवस साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समधून झाली नाही. ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर कोर्स्के आरा यांनी हा दिवस खास बनवला.
- 2009 मध्ये ते सहकारी फोटोग्राफर्सबरोबर यादिवशी एकत्र जमले आणि जगभरात याचा प्रचार प्रसार केला.
- त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2010 पासून अधिकृतरित्या फोटोग्राफी डे साजरा होऊ लागला. या दिवशी त्यांनी जगभरातील 270 फोटोग्राफर्सचे फोटो प्रथमच ऑनलाइन गॅलरीद्वारे सादर केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, भारतीय इतिहासातील काही रेअर Photos
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.