Suicide / तरुणीची हत्या करुन तरुणाने घेतला गळफास, कल्याणमधील गेस्ट हाऊसमध्ये आढळले दोघांचे मृतदेह


रुमचे दार उघडत नसल्याने हॉटेल मालकाने पोलिसांना माहिती दिली

दिव्य मराठी वेब

Jul 20,2019 01:04:00 PM IST

मुंबई- मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये काल(19 जुलै)रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गेस्ट हाऊसमधील रुममध्ये एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


तरुणांचे नाव अरुण गुप्ता तर तरुणीचे नाव प्रतिभा प्रसाद आहे. प्रतिभाची हत्या करुन अरुणने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रतिभा ही मुंबईच्या घाटकोपर परिसरातील रहिवासी होती, तर अरुण उत्तर प्रदेशच्या आझमगडचा राहणारा होता. काल दुपारी दीडच्या सुमारास गेस्ट हाऊसमध्ये 204 क्रमांकाची रूममध्ये ते आले. रात्री 9.30 च्या सुमारास हॉटेलच्या वेटरने जेवणासाठी त्यांच्या रुमचा दरवाजा ठोठावला. पण दरवाजा उघडत नसल्याने हॉटेल मालकाने पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस पोहोचल्यानंतर हत्या व आत्महत्येचा प्रकार समोर आला.

X
COMMENT