आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट नोटा छापणाऱ्या तरुणास औरंगाबादेत अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : दोन हजार, १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या शेख समरान ऊर्फ लकी रशीद शेख (रा. जसवंतपुरा, नेहरूनगर) या २६ वर्षीय तरुणास पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याने नाशिक, मालेगाव, बदनापूर, जालना शहरातील बाजारपेठेत सुमारे सहा लाखांंच्या नोटा वापरल्या. भोपाळमध्ये सॉफ्टवेअरचे शिक्षण घेत असताना तो नोटा छपाईचे तंत्र शिकला होता. बनावट नोटा चलनात आणणारी मोठी टोळी कार्यरत असावी, अशी शक्यताही पोलिसांनी वर्तवली.


औरंगाबादेतील एक तरुण बनावट नोटा तयार करत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दोन जण सेव्हन हिल्स परिसरातील एका उद्यानात खऱ्या नोटांच्या मोबदल्यात दुप्पट बनावट नोटा देण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यावरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी उद्यानात सापळा रचला. एक तोतया ग्राहक उभा केला. त्याच्याकडे सय्यद सैफ सय्यद असद (२४, रा. कटकट गेट) व सय्यद सलीम सय्यद मोहंमद यार (२२, रा. रांजणगाव) यांनी १०० रुपयांच्या ९५ नोटा देताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर या नोटा समरानकडून मिळाल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने समरानला अटक केली.

भोपाळला शिकला बनावट नोटांचे तंत्र
सिडको परिसरातील एका महाविद्यालयातून बी. एस्सी. संगणक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला समरन काही वर्षांपूर्वी भोपाळला सॉफ्टवेअरचे क्लासेस करण्यासाठी गेला होता. तेथे त्याने बनावट नोटांचे तंत्र आत्मसात केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. संबंधित. दिव्य सिटी
 

बातम्या आणखी आहेत...