आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाणीचा बदला घेण्यासाठी बनवला Whatsapp ग्रुप, नाव ठेवले AK-47 आणि नंतर झाले असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ(मध्यप्रदेश)- व्हॉट्सअॅप ग्रुपमधील वाद किती मोठा होऊ शकतो, याचे ताजे उदाहरण मध्‍य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. येथे व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनने जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी आपल्या जुन्या शत्रुंना व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले आणि शिव्या आणि जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज त्यावर टाकले. यामुळे समोरच्या पक्षातील सगळेजण रागात आले आणि नंतर दोन्ही ग्रुप समोरासमोर आले. दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी झाली, यात लाठी आणि दगडाचाही पावर करण्यात आला. या रक्तरंजित वादात दोन महिलासहित एट डझन लोक जखमी झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल करून, पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.


येथील खटीक मोहल्ला परिसरात संतोष खटीक नावाचा व्यक्ती राहतो. संतोषचा मुलगा छोटू खटीकचा शेजारी राहणाऱ्या गौरव खटीकसोबत वाद सुरू होता. एका लग्नात शेजारी गौरव खटीकने आपल्या मित्रांच्या मदतीने छोटू खटीकला मारहाण केली होती. छोटूला या गोष्टीचा बदला घ्यायया होता, त्यामुळे त्याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला आणि त्याचे नाव AK-47 ठेवले. छोटूने बदला घेण्यासाठी गौरवच्या घरच्यांना शिवी देणारे आणि जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज व्हायरल केले. त्यानंतर गौरवने आपल्या एक डझन नातलगांसोबत जाऊन छोटूच्या दुकानाला घेराव घातला.


दुकानावर छोटूसोबत त्याचेही कुटुंबीय बसले होते. त्यानंतर दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार हाणामारी झाली. पाहता-पाहता दोन्ही ग्रुपकडून लाठी आणि दगडांनी एकमेकांवर वार करणे सुरू केले. या घटनेत चार महिलांसहित 12 ते 13 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून 25 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.