Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | young boy drown in canal near yawal

यावलजवळील पाण्याच्या डोहात बुडून तरूणाचा मृत्यू, दोन मित्रांसोबत घरी परतत होता मयत तरूण

प्रतिनिधी | Update - May 22, 2019, 07:33 PM IST

पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला आणि त्या डोहात त्याने उडी घेतली

  • young boy drown in canal near yawal

    यावल- जळगाव हुन परत येत असताना शेळगाव बॅरेज जवळील पाण्यात बुडून एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणाचे नाव निलेश सुरेश निबाळकर (
    वय19 रा.लहान मारोती देशमुख वाडा) यावल असे आहे. घटना बुधवारी सांयकाळी घडली. या घटनेमुळे शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    यावल शहरातील लहान मारुती परिसरातील रहिवासी असलेले तीन तरुण बुधवारी दुचाकीवरून जळगावला आल होते. संध्याकाळी ते यावलला शेळगाव बॅरेज मार्गे परत येत असताना शेळगाव बॅरेजच्या जवळील साचलेल्या पाण्याच्या डोहामध्ये निलेश सुरेश निंबाळकर याला पोहण्याचा मोह झाला आणि त्या डोहात त्याने उडी घेतली. उडी घेतल्यानंतर तो थेट पाण्यात बुडाला तेव्हा त्याच्यासोबत असलेले गणेश लोहार आणि मनोज बारी यांनी आरडाओरड करून काही लोकांना तिथे बोलवले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर यावल पोलिस ठाण्यात माहिती दिली, सायंकाळी साडेसहा वाजता यावल पोलिस स्टेशनचे कर्मचारी मृतदेहाचा शोध घेण्याकरिता घटनास्थळी दाखल झाले.
    सहायक फौजदार नागपाल भास्कर, पोलिस हवालदार संजीव चौधरी आणि सिकंदर तडवी यांनी या परिसरातील काहींना त्या ठिकाणी बोलवले असून मृतदेहाचा शोध घेणे सुरू आहे.

Trending