आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Young Boy Get Arrested In The Case Of Misuse Of Social Media

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत बदनामीची धमकी देत महाविद्यालयीन तरुणीवर रेप, हनुमान नगरातून आरोपी तरुणाला अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फेसबुकवर चॅटिंग करुन मैत्री झाल्यानंतर सोशल मीडियावर बदनामी देण्याची धमकी देऊन महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरुणास पुंडलिकनगर पोलिसांनी गुरुवारी दुपारी बेड्या ठोकल्या. अत्याचारामुळे तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. हनुमान भास्कर वीर असे या तरुणाचे नाव आहे . त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. देशपांडे यांच्या समोर हजर केले असता त्यांनी दि. ७ जानेवारीपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

 

महाविद्यालयीन तरुणीशी मोबाइलवर कॉल करून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ओळख केली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. मैत्री झाल्यानंतर हनुमान भास्कर वीर (२१ रा. सावरगाव, परतूर, ह.मुु. हनुमान नगर)याने माझ्या फेसबुक पेजवरून चॅटिंग करू लागला. १ मे २०१८ रोजी हनुमान याने या तरुणीस सूतगिरणी चौकात बोलावून एका खोलीवर नेले. त्या ठिकाणी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतो.तुझ्या आई-वडिलांचा खून करतो अशा धमक्या देऊन अत्याचार केला.त्यानंतर दोन दिवसांनी ३ मे रोजी पुन्हा बोलावून घेतले आणि आली नाही तर बदनामी करण्याची पुन्हा धमकी देऊन अत्याचार केला. या प्रकारास तरुणी कंटाळली होती, एक महिन्यानंतर पोट दुखत असल्याची तक्रार तरुणीने हनुमानकडे केली त्यावेळी त्याने गर्भ चाचणी केली त्यावेळी गर्भ असल्याचे निष्पन्न झाल्यावर हनुमानने सहा गोळ्या आणून दिल्या.या गोळ्यांमुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर तरुणी त्याला भेटण्याचे टाळत होती. अखेर तरुणीने त्याच्या विरोधात पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात भादंवि ३७६, ३१३, ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून हनुमानला गुरुवारी दुपारी गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील बालाजी गवळी यांनी गुन्हा गंभीर आहे, हनुमानची वैद्यकीय तपासणी करावयाची आहे, गर्भपात करण्यासाठी गोेळ्या कुठून आणल्या याचा तपास करावयाचा आहे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने ही मागणी ग्राह्य धरून त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

 

महाविद्यालयात पाठलाग 
तरुणी भेट टाळत असल्याने हनुमान तिच्या महाविद्यालयात गेला तिथेही त्याने तिला मारहाण केली. त्यावेळी रस्त्यावरील लोक जमा होताच हनुमानने पळ काढला,असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.