आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 वर्षीय महिलेवर जडले 18 वर्षांच्या तरुणाला प्रेम, लग्नही केले, मग समोर आले 'हे' भयंकर सत्य..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगडमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे 18 वर्षीय मुलाला 34 वर्षीय महिलेशी प्रेम झाले. यानंतर दोघांनी रीतिरिवाजानुसार लग्नही केले. परंतु लग्नाच्या काही दिवसांनी पत्नीला लग्नाचे खरे कारण कळले तेव्हा धक्काच बसला.


यासाठी केले मुलाने लग्न 
आजही हुंड्याची समस्या समाजात जशास तशी आहे. आजही मुलींचा हुंड्यासाठी बळी जातोय. महिलांविरुद्ध अत्याचारांत वाढच होताना दिसत आहे. अशीच घटना छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यात घडली. येथे एका तरुणाने हुंड्यासाठी लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांनी तो पत्नीवर माहेरातून हुंडा आणण्यासाठी दबाव टाकू लागला. 

 

सूत्रांनुसार, सारंगगड परिसरातील एका 18 वर्षीय युवकाने हुंड्याच्या लोभापायी सरियातील 34 वर्षीय महिलेशी लग्न केले. लग्नाला वर्षही उलटत नाही तोच तो महिलेवर माहेरातून 1 लाख रुपये आणण्याचा दबाव टाकू लागला. तिने नकार दिल्यावर पतीने दुसरे लग्न केले. यानंतर महिलेने पोलिसांत जाऊन पतीविरुद्ध शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयातून कोठडी मिळवली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, सारंगगडच्या कपरतुंगाचा रहिवासी अनिल बैरागी याने 2012 मध्ये सरियाच्या गायत्री बैरागीशी रीतिरिवाजानुसार लग्न केले. लग्नानंतर एका वर्षांनेच तो छोट्या-छोट्या गोष्टीवरून पत्नीला मारहाण करू लागला. त्याने पत्नीला माहेरातून 1 लाख रुपये आणणयासाठी माहेरी पाठवले, परंतु पैसे मिळाले नाहीत म्हणून तिला घरातून पिटाळून लावले. यानंतर पीडिता आपल्या माहेरी गेली. पत्नी आणि पतीमध्ये मध्यस्थीसाठी अनेकदा दोन्ही बाजूंनी बैठका झाल्या तसेच सामाजिक दबावही टाकण्यात आला, परंतु काहीही फरक पडला नाही. यानंतर पतीने संधी साधून गुपचूप दुसरे लग्न केले. यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...