आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्जरच्या वायरने आठवीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास; लहान भाऊ शिकवणीहून घरी परतल्यानंतर समोर आला प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने मोबाइल चार्जरच्या वायरने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मयूर पार्कमधील भगतसिंगनगरात शनिवारी घडली. प्रद्युम्न राजू हिवाळे (१४) असे त्याचे नाव आहे. दुपारी तीन वाजता लहान भाऊ शिकवणीहून घरी परतल्यानंतर हा प्रकार समोर आला.

 

प्रद्युम्न इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील गंगापूर भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असून आई गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊ दुपारी शिकवणीला गेला होता, तर वडील कार्यालयात गेले होते. त्याची आई काही तासांपूर्वीच खुलताबाद येथे दर्शनासाठी गेली. यादरम्यान प्रद्युम्नने गळफास घेतला. त्याचा लहान भाऊ घरी परतला तेव्हा बराच वेळ दार वाजवूनही ते प्रद्युम्नने न उघडल्यामुळे भावाने ही बाब घरमालकांना सांगितले. त्यांनी दार तोडताच प्रद्युम्नने गळफास घेतल्याचे समोर आले.

 

शेजाऱ्यांनी याबाबत हर्सूल पोलिस ठाण्यात माहिती दिला. ही माहिती मिळताच हर्सूल पोलिसांनी धाव घेत प्रद्युम्नला घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. निरीक्षक मनीष कल्याणकर, हेड कॉन्स्टेबल पी. एच. तायडे प्रद्युम्नच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.

 

खिडकीत अडकवले होते मोबाइल चार्जरचे वायर
आई खुलताबाद येथे गेल्यानंतर लहान भाऊ शिकवणीला गेला. प्रद्युम्न घरी एकटाच होता. प्रद्युम्नचे कुटुंब येथे भाड्याने राहत होते. अर्धा तास आवाज देऊनही त्याने दार उघडले नाही. त्याची सायकल व चप्पल दारासमोर असूनही तो दरवाजा उघडत नसल्याने लहान भाऊ घाबरला. त्याने तत्काळ हा प्रकार घरमालकाला सांगितला. घरमालकाने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला तेव्हा प्रद्युम्न खिडकीला लटकलेला आढळला. त्यानंतर त्यांनी हर्सूल पोलिसांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...