आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Young Couple Find Diamond Rings Worth £14k In A Old Second Hand Game They Purchased For Summer Vacation

भंगारमधून खरेदी केला 140 रुपयांचा जुना गेम, डब्बा उघडला तर उजळले नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनाडा. सिडनीमधून कनाडा येथे राहायला आलेल्या एका कपलचे आयुष्य क्षणार्धात बदलून गेले. त्यांनी भंगारमधून एक जुना गेम खरेदी केला आणि त्यांचे नशीब पालटले. क्रिस आणि त्याची बायको मँडी येथे शिफ्ट झाल्यानंतर काही जुने सामान पाहण्यासाठी एका भंगारवाल्याकडे पोहोचले. येथे क्रिसच्या बायकोची नजर एका जुन्या गेमकडे पडली. मँडीने विचार केला की, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आपण या गेमच्या माध्यमातून चांगला टाइमपास करु शकू. यासाठी 140 रु. देऊन तिने हा सेकंड हँड गेम खरेदी केला.


- क्रिस आणि त्याची बायको रात्री उशीरा हा गेम खेळत असतात. गेम खेळल्यानंतर ते काही कार्ड्स पुन्हा ठेवतात, पण ते त्यामध्ये पुन्हा फिट होत नाही. तेव्हा मँडीची नजर यामध्ये असलेल्या एका कंपार्टमेंटवर पडते.
- ती ते लक्षपुर्वीक बघते तर तिचा तिच्या नजरेवर विश्वास बसत नाही. यामध्ये एक डायमंड रिंग असते.

 

क्रिसला वाटते की, ती खरी नाही 
- मँडी एक रिंग काढते. त्यामागे अजून पाच रिंग निघतात. जवळच उभा असलेला क्रिस या सहा रिंग पाहून म्हणतो की, कदाचित या रिंग नकली असतील. तेव्हाच तो ज्वेलरी शॉपमध्ये काम करणा-या आपल्या मित्राला बोलवून याविषयी विचारतो. मित्र म्हणतो की, या ख-या हि-यांच्या अंगठ्या आहेत. यांची किंमत 14 हजार पाउंड म्हणजेच जवळपास 13.5 लाख रुपये आहे.

क्रिसने दाखवला प्रामाणिकपणा
- हे ऐकूण पती-पत्नी आनंदात नाचू लागतात. क्रिस प्रामाणिकपणा दाखवत त्या गेमच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचे प्रयत्न अयशस्वी होतात. अखेर तो त्या अंगठ्या स्वतः जवळ ठेवतो. तो म्हणतो की, त्याच्या 140 रुपयांच्या इन्वेस्टमेंटने त्याचा 14 लाखांचा फायदा केला. 
 

बातम्या आणखी आहेत...