Maharashtra Special / शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा झटका लागून मृत्यू, मोहोळ तालुक्यात घडली घटना

मोटारीच्या पेटीमध्ये करंट उतरल्याने शॉक बसला

Sep 06,2019 08:23:50 PM IST

पापरी- विहीरीवर विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा विद्युत शॉक लागुन मृत्यु झाल्याची घटना. मोहोळ तालुक्यातील सारोळे गावात आज शुक्रवार (दि. 6) रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली. जीतेंद्र नागनाथ शेळके (वय30 रा. सारोळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मोहोळ पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र शेळके हा त्याच्या सामायीक विहीरीवर दुपारी विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला होता. त्याला माहित नव्हते की, मोटार चालू करण्याच्या पेटीमध्ये विद्युत प्रवाह उतरला आहे. त्याने पेटीला हात लावताच विजेचा जोरदार झटका बसला. त्यानंतर त्याला तत्कळ उपचारासाठी मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.
गौरी गणपती उत्सव काळात एका तरुण शेतकऱ्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

X