आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात कैद्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनने दुचाकीला उडवले, तरुण-तरुणी ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ न्यायालयातील काम आटोपून सात कैद्यांसह जळगावकडे निघालेल्या पोलिस व्हॅनने शुक्रवारी सायंकाळी महामार्गावरील टि.व्ही.टॉवरसमोर दुचाकीला उडवले. दुचाकीला उडवल्याने चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव पोलिस व्हॅन कलंंडली.दोन वेळा पलटी घेऊन ती रस्त्याच्या कडेला आडवी झाली.या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण-तरुणी ठार झाले. तर चालकासह ४ पोलिस आणि एक कैदी असे एकूण ५ जण जखमी झाले आहेत.शुक्रवारी सायंकाळी ५.१५ च्या सुमारास जळगाव-भुसावळ महामार्गावर हा अपघात झाला. 


उमेश संजय वारुळे (वय २२, रा. चंदनवाडी, शनिपेठ) व जयमाला प्रभाकर गायकवाड (वय २६, रा.हिवरखेडा, ता. जामनेर) असे दुचाकीस्वार (एएमच १९ सीसी ८८३३) मृतांची नावे आहेत. व्हॅनमध्ये सात पोलिस कर्मचारी आणि सात कैदी असे एकूण चौदा जण बसलेले होते.


जयमालास वाचवण्यासाठी शर्थ 
गंभीर जखमी जयमालाचा उजवा पाय मोडला होता. डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर अंबूबॅगच्या मदतीने तिला कृत्रीम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. यानंतर नातेवाइकांनी तिला दोन खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, प्रकृती खराब झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. 


कैदी बचावले 
गजानन दत्तू जाधव (वय २७), आकाश अरुण मोहने (वय २२) व आकाश रामचंद्र गोसावी हे तीन पोलिस कर्मचारी आणि सुरेश पंडित बोदडे (वय ३४, ता.रावेर), शेख कलीम शेख सलीम (वय २७, रा.भुसावळ), चंद्रभान श्यामराव सोनवणे (वय ३०, रा. शेळगाव), सदाशिव पंढरी पवार (वय २१, रा. बोदवड), आनंद महादू वानखेडे (वय २३, चुंचाळे, ता. यावल) व शेख अशरफ शेख चांद कुरेशी (वय ३०, रा. बोदवड) यांना दुखापत झाली नाही. 


पाच जखमी 
पोलिस व्हॅनचे चालक अनिल तायडे, प्रकाश विश्राम काळे (वय ५६, रा. पिंप्राळा), गयासोद्दीन कमरुद्दीन शेख (वय ५७, रा. पोलिस लाइन), दिलीप प्रकाश केंद्रे (वय २९, रा.पोलिस लाईन) हे चार पोलिस कर्मचारी आणि व्हॅनमधील भागवत दामू सूर्यवंशी (वय ५४, रा. साकळी, ता. यावल) हे कैदी असे पाच जण जखमी झाली आहेत. 


एरंडोल-भालगाव रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटली, चालकासह २ ठार 
एरंडोल ते भालगाव दरम्यान कुत्रा आडवा आल्याने भरधाव असलेली रिक्षा उलटली. त्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच तर एका प्रवाशाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक महिला प्रवासीदेखील जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भालगाव येथील रिक्षाचालक ज्ञानेश्वर रावजी मराठे (वय ३६) हे प्रवासी घेऊन रिक्षा(एमएच १९, सीई ९५२६)ने एरंडोल येथे येत होते. या वेळी कुत्रा आडवा आल्याने अचानक रिक्षा उलटून चालक ज्ञानेश्वर रावजी मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षातील मिठाराम गजमल मराठे (वय ६५, रा. एरंडोल) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ जळगावला हलवण्यात आले हाेते. उपचार सुरू असताना मराठे यांचाही मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...