आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फरीदाबाद- पिडीत युवतीने सांगितेल 4 वर्षे तिला बंदी बनवून तिच्यावर अमानवीय आत्याचार करण्यात आले. त्यासोबतच तिला मारहाण करून दीड महिना उपाशी ठेवण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
दिल्ली जवळील फरीदाबादमध्ये युवतीला 4 वर्षे बंदी बनवून तिच्यावर अमानवीय आत्याचार करण्यात आले, त्यासोबतच मारहाण करून दीड महिना उपाशी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिच्या शरिरावर अनक जखमांच्या खुणा आहेत. संधी साधून युवतीने नराधमांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली, पण रस्त्यात ती बेशुद्ध पडली तेव्हा आसपासच्या लोकांनी तिला एका एनजीओकडे सुपूर्द केले आणि त्यांनी तिला रूग्णलयात भर्ती केले.
युवतीने सांगितले की, 4 वर्षांपूर्वी प्रदिप नावाच्या मुलाने तिला फुस लावून बरेलीला नेले, आणि लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर 4 वर्षे बलात्कार केला. यादरम्यान युवती अनेकवेळा गर्भवती झाली पण आरोपीने बळजबरीने तिचा गर्भपात केला. 8 महिन्यांपूर्वी आरोपीने तिला त्याची आई आणि भावाकडे सोडले आणि तेव्हापासून तो रोज तिला मारहाण करू लागला आणि अनेकवेळा त्याच्या छोट्या भावानेही बलात्कार केला तेव्हा मला त्याचा हेतू कळाला.
या सर्व प्रकारात आरोपीच्या आईने त्यांना मदत केली, त्यादरम्यान तिला खायला दिले जात नव्हते आणि कुठेच बाहेरदेखील जाउ दिले जात नव्हते. जेव्हा घरातील लोक बाहेर जायचे तेव्हा युवतीला घरात बंद करून जायचे आणि जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत खायला मिळायच नाही.
ज्या एनजीओने युवतीला रूग्णालयात भर्ती केली त्यांनी सांगितले की, मुलीच्या आधार कार्डवरून तिच्या कुटुंबीयांना मुलीची माहिती देण्यात आली. त्यांना माहित देखील नव्हते की, त्यांची मुलगी जिवंत आहे का नाही ते.
पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात येईल असे सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.