आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर पुण्यात बलात्कार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - आईबरोबर भांडण झाल्याने घराबाहेर पडलेल्या एका १९ वर्षीय तरुणीवर घोरपडी रेल्वेस्थानकाजवळ तरुणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात तरुणाविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील रविवार पेठेत राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. घरी असताना पीडित तरुणीचे आईबरोबर भांडण झाले. त्यामुळे ती बुधवारी सायंकाळी घरातून बाहेर पडली. पुणे रेल्वेस्थानकात येऊन  तरुणी बंगळुरूकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये बसली. तिकीट नसल्याने टीटीने तिला कराड रेल्वेस्थानकात उतरण्यास सांगितले होते. पीडित तरुणी कराड रेल्वेस्थानकात उतरून पुन्हा पुण्याकडे येण्यासाठी पॅसेंजरमध्ये बसली. रेल्वेत तिला एक तरुण भेटला. त्याने तिला रिक्षाने घरी सोडतो, असे सांगत घोरपडी रेल्वेस्थानकावर नेले. त्यानंतर तिथून त्याने तरुणीला एका खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले.