आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Incident Like Hyderabad Happened In Buxar, Girl Killed After Rape Burn Dead Body

तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला, बलात्कारानंतर हत्या केल्याचा संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणीची ओळख लपवण्यासाठी जाळला मृतदेह

बक्सर(बिहार)- जिल्ह्यात आज(मंगळवार) एका तरुणीचा अर्धा जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांना संशय आहे की, बलात्कारानंतर तरुणीची हत्या झाली असावी. तरुणीच्या डोक्यात गोळी मारण्यात आली आहे. सध्या पोलिस तरुणीची ओळख पटवून घेत आहेत. तरुणीचा मृतदेह इटाडी तालुक्यातील कुकुढा गावात मिळाला. आरोपींनी शेतातील भुश्यात तरुणीला जाळले. तरुणीवर बलात्कार केल्यानंतर हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओलावा असल्यामुळे मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. एसडीपीओ सतीश कुमार यांनी सांगितले की, सध्या तरुणीची ओळख पटवून घेतली जात आहे. लवकरच आरोपींना पकडण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...