आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला जाण्यासाठी पैसे नसल्याने मुलीची अात्महत्या, कळंब तालुक्यातील शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डाेंगर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिराढोण - मुंबई येथे रेल्वे विभागाच्या परीक्षेला जाण्यासाठी वडिलांकडे पैसे नसल्याने बीकॉमच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कळंब तालुक्यातील पिंपरी(शि.) येथे शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रगती अविनाश राऊत असे मृत मुलीचे नाव अाहे. 

 

पिंपरी (शि.) येथील शेतकरी अविनाश राऊत यांची मुलगी प्रगती (२०) ही मुरुड (ता. लातूर) येथे बी.काॅम. तृतीय वर्षात शिकत हाेती. स्पर्धा परीक्षाही देत हाेती. मुलीच्या शिक्षणाचा भार वडील अविनाश यांना झेपत नव्हता. एक एकर कोरडवाहू जमीन असलेले अविनाश हे मोलमजुरी करून मुलीच्या शिक्षणाचा खर्च भागवत होते. यातच प्रगती यांनी मुंबईत परीक्षा देण्यासाठी वडिलांकडे पैसे मागितले. त्यावर तिच्या अाई-वडिलांनी कळंबला जाऊन बचत गटाला कर्ज देणाऱ्या फायनान्सकडून कर्ज काढतो व तुझी गरज भागवतो, असे सांगितले. यानंतर प्रगतीला मुरूडला पाठवून ते कळंबला रवाना झाले. शनिवारी सकाळी राऊत दांपत्य कळंबला गेले. या ठिकाणी दिवसभर धावपळ करून रक्कम हस्तगत गेली अन् सायंकाळी गावाकडे रवाना झाले. घरी पोहोचल्यानंतर त्यांना शेतातील घरात आपल्या लेकीचा लटकत असलेला मृतदेहच दिसला. 

बातम्या आणखी आहेत...