आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात सुरू होती लग्नाची तयारी, यावेळी ओळखीच्या युवकाने तरूणीचे केले अपहरण, नंतर वेगवेगळ्या जागी अनेकवेळा केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड(छत्तीसगड)- येथील एका तरूणीचे लग्न ठरले होते, घरात लग्नाची तयारी सुरू होती. या दरम्यान तिचा ओळखीच्या तरूणाने तिला बहाण्याने बाहेर बोलावले आणि उचलून घेऊन गेला. त्यानंतर वेगवेगळ्या स्थानी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यात एका ओळखीच्या महिलेनेही आरोपीला या कामात साथ दिली. कसे-बसे तरूणीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि घरी पोहचून घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून तरूण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे.


लैलूंगामध्ये राहणाऱ्या एका तरूणीचे या महिन्यातच लग्न होते. 4 मे रोजी सरियाचा रहिवासी सुशील चौहान आला आणि त्याने तरूणीला बहाण्याने बाहेर बोलावले. त्यानंतर तिला घेऊन गेला आणि वेगवेगळ्या जागी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.


कसे-बसे तिने आरोपीच्या तावडीतून आपली सुटक करून घेतली आणि घरी परतली. यानंतर तिने आपल्या कुटुंबीयांसोबत जाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीवरून लैलूंगा पोलिसांनी आरोपी आणि त्याची मदत करणाऱ्या महिलेविरूद्ध कलम 376, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

बातम्या आणखी आहेत...