आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी आहे घाणेरडी प्रथा, मुलगी दान करतात त्यांचे केले जाते शोषण, सरकारने बॅन आणूनही सर्रास सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण आफ्रिका - जगभरात आज अशा काही रुढी, परंपरा आणि मान्यता आहेत ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असतात. दक्षिण आफ्रिकेच्या घानामध्येही अशीच एक परंपरा आहे. यात कमी वयाच्या अविवाहित मुलींना बंदी बनवून पुजाऱ्यांच्या ताब्यात दिले जाते. ते या मुलींचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण केली जाते आणि अनेक मुलेही जन्माला घातली जातात. ज्या कुटुंबाने ईव्ही प्रजातीच्या नियमांनुसार पाप केले असेल किंवा नियम मोडला असेल त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून असे केले जाते. कुटुंबातील मुलगी दान केल्यास पाप नष्ट होतात असे येथे समजले जाते. 


वोल्टा परिसरात राहणाऱ्या ईव्ही प्रजातीचे नियम अत्यंत विचित्र आहेत. येथे चोरी सारख्या लहान गुन्ह्यामध्ये पकडले गेले तरी मुलगी दान द्यावी लागते. येथे पुजा केल्या जाणाऱ्या देवासमोर ही मुलगी पुजाऱ्याच्या ताब्यात दिली जाते. मुलीला संपूर्ण जीवन त्याच पुजाऱ्याबरोबर राहावे लागते. याला त्रोकोसी परंपराही म्हटले जाते. येथे मुलीचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होते. पुजारी देवाच्या नावावर मुले जन्माला घालतात आणि त्यांनाही स्वतःचे दास बनवून ठेवतात. आता तर अनेक मुली पिढ्यान पिढ्या येथे बंदी बनून आहेत. आपल्या आईवर नेमका असा काय आरोप होता की त्यांना एवढ्या पिढ्या हे सहन करावे लागत आहे. 


प्रजातीतील लोकांना योग्य वाटते 
ईव्ही प्रजातीतील लोकांना हा प्रकार योग्य वाटतो. यात काहीही गैर नसल्याचे त्यांचे मत आहे. येथील मुलींवर अत्याचार होतात हे ते कबुलच करत नाहीत. त्यांच्या मते ही पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठीची परंपरा आहे. अविवाहित मुलींना देवाच्या दासी बनवले जाते असे, लोकांचे म्हणणे आहे. 


मुलगी मेली किंवा पळून गेल्यास..
या परंपरेतील सर्वात धक्कादायक प्रथा म्हणजे बंदी असलेली मुलगी मेली किंवा पळून गेली तर तत्काळ तिच्या जागी तिच्या कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या मुलीला बंदी बनवले जाते. अनेक प्रकरणांत एकाच कुटुंबातील चार-पाच मुलीही बंदी बनतात. 


1998 मध्ये लावला होता बॅन 
या परंपरेवर 1998 मध्ये घाना सरकारने बॅन लावला होता. सरकारने असा प्रकार करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेचा कायदाही तयार केला होता. तरीही ही परंपरा घानाच्या वोल्टामध्ये प्रचलित आहे. 

बातम्या आणखी आहेत...