आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मथुरा येथील घटना : 'राम राम' न म्हटल्यामुळे परदेशी भाविकावर केला चाकूने हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा - येथील गोवर्धन भागात मंगळवारी परिक्रमा मार्गावर परदेशी भाविकावर एक युवकाने चाकूने वार केले. यामध्ये भाविक जखमी झाला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जखमीला रूग्णालयात दाखल केले. 

 

भजन करत असताना केला हल्ला

लातविया देशाचा नागरिक असलेला जेमित्रिज टूरिस्ट व्हिसावर भारतात आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो राधाकुंड येथील खजूर घाटावर राहत आहे. जेमित्रिज मंगळवारी सकाळी भजन करत असताना ऋषी नावाचा व्यक्ती तेथे आला आणि त्याने परदेशी नागरिकाच्या गळ्यावर चाकूने वार केला. 

 

या हल्ल्यात परदेशी नागरिक जखमी झाला. पोलिस प्रभारी इंद्रजीत सिंह यांनी जखमीला रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. सुदैवाने त्याच्या मानेवर मोठी जखम झाली नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 

रागाच्या भरात केला हल्ला

आरोपी युवकाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याने परदेशी भाविकाला राम राम केले, पण त्याने उत्तर दिले नाही. आरोपी पुन्हा एकदा राम राम म्हटल्यानंतर भाविकाने त्याच्या कानशिलात लगावली. याचा राग आल्याने युवकाने भाविकावर चाकूने वार केले. 

बातम्या आणखी आहेत...