आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाने हॉटेलमध्ये जाऊन घेतली फाशी, 4 पानी सुसाइड नोटमध्ये लिहिले, माझ्या निरागस मुलीला त्यांच्याकडे जाऊ देऊ नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाने हॉटेलमध्ये फाशी घेत आत्महत्या केली. त्याचे चार पानांचे सुसाइड नोटही सापडले आहे. त्यात लिहिले आहे, पत्नी आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळाची खोटी केस केली आहे. त्यानंतर त्यांनी तडजोडीच्या बहाण्याने झाशीला बोलावले पण घटस्फोटासाठी दबाव आणला. तसेच जर घटस्फोट दिला नाही तर अडीच वर्षाच्या मुलीसह त्यालाही मारून टाकण्याची धमकी दिली. 


हॉटेलमध्ये सापडले सुसाइड नोट
मृत दिनेश (32) सदर बाजारचा रहिवासी होती. हॉटेलमधून सुसाइड नोट मिळाली. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाबाबत लिहिले होते. त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर लावलेले खोटे आरोप मागे घेण्याची विनंतीही त्याने केली. माझ्या मुलीला त्यांच्याकडे राहू देऊ नका असेही त्याने सुसाइड नोटमध्ये लिहिले. तसेच संबंधितांवर कडक कारवाईची विनंतीही केली आहे. 


माहेरी गेली तर परतलीच नाही.. 
मृताचा मोठा भाऊ संजयने सांगितले की, दिनेशचे 2014 मध्ये ग्वाल्हेरच्या कंचन शर्माशी लग्न झाले होते. त्यांचा अडीच वर्षांची मुलगी मोक्षिता आहे. दीड वर्षांपूर्वी कंचन आई वडिलांना भेटायला ग्वाल्हेरला गेली, नंतर ती परत आलीच नाही. उलट दिनेशला ग्वाल्हेरला शिफ्ट होण्याचा आग्रह धरला. त्याने नकार दिल्यानंतर तिने छळाची तक्रार केली. पण तिच्याकडे इंदूरचा पत्ता नसल्याचे तो गुन्हा दाखल झाला नाही. एक दिवस कंचनने तडजोडीच्या बहाण्याने दिनेशला ग्वाल्हेरला बोलावले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी दिनेशला धमकावले. त्यानंतर ते पोनवर त्याला त्रास देत होते. 


दिनेशला शोधण्यासाठी त्याचा भाऊ डायरीत मित्रांचे फोन नंबर शोधत होता. त्याचवेळी त्याला डायरीत सुसाइड नोट मिळाले होते. तेव्हाच त्याने पोलिसांत ती माहिती आणि तक्रार दिली होती. पण पोलिसांनी फार गांभीर्याने घेतले नाही. 

बातम्या आणखी आहेत...