आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासू जावयाला म्हणाली- तू मरूनच जा.. या गोष्टीने एवढ्या वेदना झाल्या की, त्याने लग्नाच्या 2 महिन्यानंतरच रेल्वेखाली कटून दिला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालधंर- पत्नी आणि सासुरवडीच्या त्रासाला कंटाळून 31 वर्षांच्या रोहित साहनीने रविवारी सकाळी 8 वाजेला रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली. जीआरपीने रोहितची आई प्रभा साहनी यांच्या जबाबानुसार सून चांदनी ढल्ला, तीची आई लाडी ढल्ला, वडिल गुरमीत सिंह ढल्ला आणि भाऊ राहुल ढल्ला यांच्या विरूद्ध कलम 306- 34 अंतर्गत केस दाखल केली आहे.
 
 
 तरनतारनहून लुधियाना जात असलेल्या मालगाडीसमोर तरुणाने आत्महत्या केल्याची सुचना मिळताच जीआरपी नेशव पोस्टमार्टमसाठी सीव्हिल हॉस्पीटलमध्ये पाठवले. तसेच, मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकताच प्रभा साहनी मुलीसोबत जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये पोचचल्या होत्या.
 
 

काही दिवसांपुर्वीच ढल्लाने गोंधळ घातला होता...
प्रभा साहनीने सांगितले की, दोन महिन्यांपुर्वीच भगत सिंह चौकाजवळ राहणाऱ्या ज्वेलर गुरमीत सिंह ढल्ला यांची मुलगी चांदनी ढल्लासोबत मुलाचे लग्न झाले होते. हे चांदनी ढल्लाचे दुसरे लग्न होते. यापुर्वीही सासुरवाडीत तिचा वाद झाला होता. आता रोहितसोबत लग्नानंतर चांदनी आपल्या आई लाडी ढल्ला यांच्या सांगितल्याप्रमाणे रोहितला परेशान करत होती. काही दिवसांपुर्वीच चांदनी भांडून माहेरी गेली होती. त्यानंतर लाडी ढल्ला डझनभर लोकांसोबत त्यांच्या घरी आली आणि गोंधळ घातला होता. तेव्हा लाडी रोहितला म्हणाली होती तु मरुनच जा. त्यानंतर रोहित खुपच परेशान राहू लागला होता. रविवारी एवढे मोठे पाऊल उचलले. त्यांनी सांगितले की, 18 वर्षापुर्वी नवरा इरवान साहनीचा मृत्यू झाला होता. आता मुलगाही या जगात राहिला नाही. 

बातम्या आणखी आहेत...