आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्फी घेणे युवकाच्या जीवावर बेतले, बुडणाऱ्या युवकाला वाचवण्यासाठी नदीत उडी मारली, तोंडाने श्वासदेखील दिला पण वेळ निघून गेली होती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिकेश(उत्तराखंड)- सेल्फीचा नाद एका युवकाच्या जीवावर बेतला आणि पाण्यात बुडल्याने त्याचा मृत्यू झाला. सांगितले जात आहे की, गंगा नदीमध्ये 4 मित्रांसोबत गेलेल्या युवकाचा पाय सटकून तो पाण्यात पडला. तिथे आलेल्या विदेशी पर्यटकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला पाण्यातून बाहेर काढून तोंडाने श्वास दिला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. घाई-घाईत लोकांनी त्याला रूग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


एन्जॉय करण्यासाठी गेला होता युवक
युवकाचे नाव आशीष जदली(22) आहे, तो कोटद्वारचा रहिवासी आहे. आशीषच्या कुटुंबीयांना मृत्यूची माहिती दिली आहे. तो आपल्या चार मित्रांबरोबर ऋषिकेशला फिरण्यासाठी आला होता. सगळे मित्र मस्तराम घाटावर गंगेद अंघोळ करण्याची तयारी करत होते. दुसरीकडे आशिष किनाऱ्यावर थांबून सेल्फी घेत होता, तेवढ्यात अचानक त्याचा पास घसरला आणि तो नदीच्या प्रावाहाबरोबर बुडाला. लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला, पण तोपर्यंत त्याचा जीव गेला होता.

बातम्या आणखी आहेत...