आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीच्या वादामुळे दोन भावांवर हल्ला, एकावर झाडल्या गोळ्या, हत्येनंतर गावात तणावपूर्ण वातावरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा(उत्तर प्रदेश)- येथील खौड चिंदरपूरा गावात सोमवारी रात्री जमिनीच्या वादामुळे एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी त्याच्यावर 4 गोळ्या झाडल्या. त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या भावाने कसे-बसे आपला जीव वाचवला. हत्या करून हल्लेखोरांनी हवेत बंदुक भिरकावत तेथून पळ काढला. रात्री एस.पी. प्रमोद कुमार घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावणर निर्माण झाले आहे, त्यामुळे गावात पोलिसांचा मोठा फोज फाटा तैणात करण्यात आला आहे. 

 

खौड चिंदरपूराच्या रूप सिंह यांची काही गुंठे जमीन गहान ठेवली होती. ज्याला रूप सिंह यांच्या सहमतीने त्यांचा भाच्चा होराम सिंहने दिढ वर्षांपूर्वी सोडवून आपल्या नावावर केली होती. त्यानंतर त्यांच्याच कुटुंबातील एक बहादुर सिंहने याच्याविरोधात कोर्टात तक्रार दिली.


त्यांच्यात अनेक दिवसांपासून हा वाद सुरू होता. सोमवारी रात्री मुनेश आपला भाऊ चंद्रेशसोबत भदरौलीच्या बाजारावरून परत येत होता. आधीपासूनच गावात घात लावून बसलेल्या आरोपींनी लाथ मारून त्यांची गाडी पाडली आणि मुनेशला पकडून त्याच्यावर चार गोळ्या झाडल्या.


हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यावर, खांद्यावर आणि छातीवर अशा चार गोळ्या मारल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. भावाला वाचवण्यासाठी चंद्रेश हल्लेखोरांच्या अंगावर धावून गेला, पण मुनेशच्या मृत्यूनंतर त्या सगळ्यांनी चंद्रेशला जबर मारहाण केली. त्याने कसे-बसे स्वतःचा जीव वाचवत तेथून पळ काढला.


घटनेनंतर आरोपींनी हवेत बंदुक भिरकाऊन तेथून पळ काढला. सुचना मिळताच एस.पी. प्रमोद कुमार, सी.ओ. उदयराज सिंह फोर्स घेऊन घटनास्थळी पोहचले. मुनेशचे वडील होराम सिंहने बहादुर सिंहसहित चार जणांची तक्रार दिली आहे. पोलिस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...