आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण-तरुणीने हॉटेलमध्ये बुक केली रूम, 2 तास सगळे शांत होते, अचानक ऐकू आली किंकाळी, बाथरूमच्या खिडकीतून निघाली रक्ताने माखलेली तरुणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोएडा - सेक्टर-63 येथील एका हॉटेलच्या रूममध्ये गुरुवारी दुपारी एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर गोळी झाडली आणि स्वत: पंख्याला लटकून गळफास घेतला. गोळी लागल्याने जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती गंभीर आहे. तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, हे तरुण-तरुणी दोघेही गाजियाबादच्या एका कोचिंग सेंटरचे विद्यार्थी आहेत. 

 

पोलिस भरतीची तयारी करत होता मृत तरुण...
मोहित यादव (22, रा. सिकंदराबाद, बुलंदशहर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो गाजियाबादेत आत्याच्या घरी राहायचा आणि पोलिस भरतीची तयारी करत होता. त्याचे वडील सुंदर सिंह यूपी पोलिसांत शिपाई आहेत. सुंदर सिंह यांना तीन मुले आहेत. मोहित सर्वात मोठा होता. दुसरीकडे, जखमी विद्यार्थिनी ही गाजियाबादच्याच कृष्णा विहार कॉलनीत राहते.

 

2 तास सर्व शांत होते, अचानक ऐकू आली किंकाळी
तरुणी-तरुणीने गुरुवारी सकाळी 10.20 वाजता नोएडाच्या सेक्टर-63 च्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळपर्यत एक रूम किरायाने घेतली. दोघेही हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर थांबले होते. 2 तासांपर्यँत सर्व काही ठीक होते. दुपारी 12.45 वाजेदरम्यान विद्यार्थिनीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हॉटेलचे कर्मचारी धावत गेले तेव्हा रूमचा दरवाजा आतून बंद होता. 


तरुणीवर गोळी झाडल्यावर ती बाथरूममध्ये लपली

हॉटेल संचालक सुभाष म्हणाले की, हॉटेल कर्मचारी दार उघडू शकले नाही म्हणून बाथरूमकडे पोहोचले. तेथे तरुणी ओरडत असल्याचे आढळले. यानंतर बाथरूमची खिडकी तोडून तिला बाहेर काढण्यात आले. तरुणीच्या छातीवर गोळी लागली होती. हे पाहताच पोलिसांनी ताबडतोब सूचना देण्यात आली. दार तोडण्यात आले तेव्हा आत रक्तच रक्त सांडलेले दिसले. तरुण पंख्याला लटकलेला होता.  

 

पोलिस म्हणाले- रूममध्ये दोघांशिवाय तिसराही आला होता...

पोलिस म्हणाले की, रूमची बुकिंग करताना तरुण-तरुणीसोबत आणखी एक जण आला होता. तोही रूममध्ये गेला होता. काही वेळानंतर तो बाहेर निघून गेला. त्याचा या घटनेशी काय संबंध आहे, याचा शोध घेतला जात आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी नोएडामध्ये पोहोचून मोठा गोंधळ घातला.  

 

बातम्या आणखी आहेत...