Home | Khabrein Jara Hat Ke | Young Mom Found Dead On 1st Day of New Year, The Reason of Death Remains a Mystery

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अचानक झाला 2 मुलांच्या आईचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळले नाही मृत्यूचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 01:21 PM IST

आईची आठवण काढत होते मुलं, ते असे काही म्हणाले की, प्रत्येक जण झाला भावूक

 • Young Mom Found Dead On 1st Day of New Year, The Reason of Death Remains a Mystery

  हैरो. नॉर्थ वेस्ट लंडनमध्ये एका 28 वर्षांच्या एश्ली ग्रंडीच्या रहस्यमयी मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. 2 मुलांच्या या सिंगल मदरचा मृतदेह नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी तिच्या घरात आढळला. एश्ली आपल्या पहिल्या पार्टनरपासून वेगळी झाली होती आणि आता एकटीच राहत होती. तर तिचे दोन मुलं 6 वर्षांची मुलगी आणि 3 वर्षांचा मुलगा काही काळासाठी आपल्या आजी-अजोबांच्या घरी गेले होते.

  ती म्हणाली मला काही बरे वाटत नाही
  - आपल्या मुलीच्या रहस्यमयी मृत्यूविषयी बोलताना 54 वर्षांचे एश आणि 51 वर्षांच्या सारा भावूक झाल्या. सारा म्हणाल्या, "आम्ही 31 डिसेंबरच्या रात्री तिच्यासोबत शेवटचे बोललो होतो. आम्ही तिला घरी ये असे म्हणालो होतो. मी म्हणाले होते की, एकटी राहण्यापेक्षा नवीन वर्षांत आमच्यासोबत पार्टी कर, तेव्हा ती म्हणाली होती की, मला काही ठिक वाटत नाही, मी घरीच राहते."

  दूस-या दिवशी मिळाला मृतदेह
  - एश्लीच्या आईने सांगितले की, त्यांनी नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी मुलीला विश करण्यासाठी तिला फोन केला. पण फोन उचलला नाही, त्यांना वाटले की, ती कामात व्यस्त असेल. यानंतर ते एश्लीच्या मुलांना घरी सोडायला पोहोचले.
  - एश्लीचे पालक त्यांच्या नातवांना घेऊन तिच्या घरी पोहोचले. त्यांनी खुप वेळा दार वाजवले. पण दार उघडले नाही. त्यांनी दूस-या चावीने घर उघडले, तेव्हा त्याना एश्ली मृतावस्थेत दिसली. त्यांनी तिथून मुलांना दूर ठेवून इमरजेंसी सर्विसला कॉल केला आणि बॉडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

  पुढे वाचा... पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय निघाले...

Trending