आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिराच्या मुद्यावर तरुणाने आपल्या कवितेतून राजकर्त्यांना फटकारले, देशातील विदारक स्थितीचे मांडले वास्तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माढा (सोलापूर)- सध्या अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या मुद्यावरुन राज्यकर्ते आपली मतांची पोळी भाजत असताना माढा तालुक्यातील बावी गावच्या चेतन सुनील मोरे या 25 वर्षीय तरुणांने आपल्या हिंदी कवितेतून राज्यकर्त्यांना चांगलेच फटकारले आहे. देशातील विदारक स्थिती चेतन याने हृदय स्पर्शी शब्दांतून मांडले आहे. शेतकर्‍यांसह सामान्यांच्या प्रश्नांकडे सत्ताधारी पक्षाने लक्ष घालण्याची मागणीही या क‍वीने केली आहे.


चेतन मोरे हा शेतकर्‍याचा मुलगा असून तो स्पर्धा परीक्षेचा तयारी करत आहे. विद्यार्थीदशेपासूनच चेतन याला कविता करण्याचा छंद जडला आहे. शालेय तसेच
महाविद्यालयीन जीवनात त्याने अनेक कविता लिहिल्या. त्याच्या काही कवितांना पारितोषिकेही मिळाली आहेत. त्याने शेतकरी, शेतमजूर यासह अन्य ज्वलंत विषयावर काव्य केले आहे. दारिद्र्य, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, प्रादेशिकतावाद, जातीयवाद, कुपोषण, उपासमारी, स्त्रीभ्रूण हत्या, पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतीमालाचे ढासळते भाव, महिलांवरील वाढते अत्याचार आदी प्रश्न देशासमोर आ वासून उभे आहेत. या सर्व प्रश्नांचे मुळापासून निराकरण करण्यासाठी इष्टतम उपाययोजना राबवणे, या समस्याबाबत जनमत जागृत करणे, लोकसहभाग वाढवणे आदी विधायक मार्गांचा अवलंब करण्याचा विसर बहुधा सत्ताधाऱ्यांना पडला की काय? असा सवालही या तरुण कवीने उपस्थित केला आहे.

 

राममंदीर अयोध्येत बांधण्याचा विषय भाजपच्या ध्यानी नसल्याचा कित्ता गिरवीत
 मागील महिन्यांपासून शिवसेनेने गिरवला आहे. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन या मुद्द्याला हात घातला. सध्या उद्धव ठाकरे राज्यभराचा दौरा करत आहेत. राममंदिराच्या मुद्द्यावर सभा घेत आहेत. मात्र, या राममंदिराच्या उभारणीचा मुद्यावर राजकीय पक्ष कसा लाभ घेतात, याबाबत सामान्य नागरिकांना काही घेणे देणे नाही. राजकर्त्यांना शेतकर्‍यांच्या प्रश्नापेक्षा राममंदिराचा प्रश्न महत्वाचा वाटत आहेत. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे अयोध्येत राममंदिर होवो अथवा न होवो याचे काय..पडलेले नाही. हाच मुद्दा चेतन याने आपल्या कवितेतून मांडला आहे. चेतनची ही कविता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

'लाख संसार उजाडके बननेवाला, नहीं चाहीये राम!

जाती धर्म की राजनिती का क्यो करना पडता है आपको काम!!

चेन्नई पूर के दौरानं, न आयी मस्जिद, ना आया मंदिर किसीं के काम!

क्यो हरबार उकसाते हो लोगोको, लेके रामजी का नाम!!

किसान, सैनिक, महिला ,युवक के विकास केलीये करते रहो काम!

विकास पे ध्यान देणेंसे राजनीती में ना आयेगा रहीम ,ना राम!!

शायद रामराज्य में रामजी भी चाहते की, मिले मेरे किसान के अनाज को माफक दाम!

लाठी,पत्थर, तलवारो के जगह दो भारत वर्ष के युवा के हात में देश जोडणे वाला काम !!

 

काय म्हणतो कवी..?
राज्यकर्त्यांनी राज्यभरातील शेतकर्‍यांची सध्याची स्थिती बांधावर जाऊन जाणून घेणे महत्वाचे आहे. मात्र, सध्या राममंदिराचा मुद्दा पुढे करून केवळ राजकीय पोळ्या भाजण्याचे काम सध्या सुरु आहे. शेतकर्‍यांच्या सामान्याचे प्रश्न महत्त्वाचे असताना राममंदीर उभारण्याचा मुद्दा चुकीचा मला वाटतो. मी शेतकर्‍यांचा मुलगा असल्याने मला त्याची जाणीव आहे. म्हणूनच मी ही परखड कविता लिहिली आहे. कवितेची एक प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहे.
कवी- चेतन सुनिल मोरे (मु.पो. बावी, ता. माढा,जि.सोलापूर)

बातम्या आणखी आहेत...