आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आयुष्मान भारत'साठी काम केल्यावर मिळतील 90000 महिन्याला, अशी आहे प्रोसेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आजपासून देशभरात आयुष्मान भारत योजना सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत 1 लाखांहून जास्त आयुष्मान मित्र नियुक्त केले जातील, त्यांना 15 हजार रुपये मासिक वेतन मिळेल. तसेच या योजनेसाठी प्रोफेशनल्सही जोडले जाणार आहेत, ज्यांना 50 हजारांपासून ते 90 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. 32 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना देशाची राजधानी दिल्ली वा इतर राज्यांच्या राजधानीमध्ये काम करण्याची संधी दिली जाईल. चला, जाणून घेऊ की या तरुणांची भरती प्रक्रिया कशी असेल आणि त्यांना काय काम करावे लागेल?

 

कोण करणार नियुक्ती 
आयुष्मान भारत योजना लागू करणारी नॅशनल हेल्थ एजन्सी ही यंग प्रोफेशनल्स प्रोग्राम सुरू करणार आहे. या प्रोग्रामअंतर्गत 32 वर्षांहून कमी वयाच्या तरुणांना नियुक्त केले जाईल.

 
कुणाला केले जाईल नियुक्त 
या प्रोग्रामअंतर्गत ज्या तरुणांना निवडले जाईल त्यांची योग्यता खालीलप्रमाणे असावी...
- विविध विषयांत मास्टर डिग्री. 
- किंवा टेक्निकल क्वालिफिकेशन उदा. बीटेक, एमबीए. 
- किंवा विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ.
- असे तरुणही अप्लाय करू शकतात, जे एम.फिल आहे. 
- किंवा रिसर्चचा अनुभव आहे. 
- किंवा त्यांचे पेपर पब्लिश झालेले आहेत.
- किंवा पब्लिक हेल्थ सिस्टिम प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याचा अनुभव असेल. 

 
प्रत्येक वर्षी वाढेल पगार 
नॅशनल हेल्थ एजन्सीद्वारे तयार करण्यात आलेल्या गाइडलाइन्सनुसार, निवडलेल्या प्रोफेशनल्सना दर महिन्याला 50 हजारांपासून ते 90 हजार रुपयांपर्यंतचा पगार दिला जावा. ज्यात ट्रान्सपोर्ट अलाउन्सही सामील असेल. याशिवा दरवर्षी 5000 रुपये वाढ करण्यात येईल. तथापि, जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतच दिले जातील.

 
पुढच्या स्लाइडवर वाचा... यासाठी काय करावे लागेल? 

 

बातम्या आणखी आहेत...