आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइकवर असताना बॉयफ्रेंडला सांगितले हेलमेट काढ ना प्लीज, टच करायचंय, मग अचानक केला Acid Attack

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथील विकासपुरी परिसरात एका तरुणीला अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली आहे. 11 जून रोजी तिने आपल्या बॉयफ्रेंडवर अॅसिड हल्ला केला होता. सुरुवातीला तिने प्रशासनासह बॉयफ्रेंडची देखील दिशाभूल केली. परंतु, एका चुकीने ती पोलिसांच्या तावडीत सापडली. सातव्या दिवशी तिला पकडण्यात आले आहे. चौकशी केली, तेव्हा आपल्या प्रियकराने प्रेम संबंध असतानाही लग्नास नकार दिला. त्याचाच बदला घेऊन आपला राग काढला अशी कबुली तरुणीने दिली आहे.


हेलमेट काढ ना प्लीज...
> दिल्लीतील विकासपुरी पोलिसांना 11 जून रोजी एक कॉल आला होता. त्यामध्ये बाइकवर जाणाऱ्या कपलवर अॅसिड हल्ला झाला अशी तक्रार करण्यात आली. पोलिस आणि स्थानिकांनी कपलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत तरुणाचा चेहरा, गळा, छाती आणि खांदे अॅसिडने भाजले होते. तर पोलिसांनी तरुणीची पाहणी केली तेव्हा तिच्या एका हातालाच अॅसिड लागले होते. दोघांचा जबाब नोंदवला तेव्हा आपण बाइकवर जात होतो आणि कुणी तरी अचानक अॅसिड फेकल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेच्या 7 दिवसांनंतर तरुणाने पोलिसांना एक क्लू दिला. त्यांनी खऱ्या आरोपीला पकडले.
> घटनेच्या दिवशी बाइकच्या बॅकसीटवर बसलेल्या आपल्या प्रेयसीने हेलमेट काढण्यास सांगितले होते असे तरुण म्हणाला. हेलमेट घातल्यामुळे तुला स्पर्श करता येत नाही असा आग्रह तिने धरला होता. हेलमेट काढल्याच्या अवघ्या काही सेकंदानंतर हल्ला झाला. पोलिसांनी वेळीच तरुणीकडे धाव घेतली आणि तिला पकडून तुझा केवळ हातच कसा भाजला अशी चौकशी केली. त्यानंतर तरुणीने संपूर्ण घटनाक्रम सांगताना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. गेल्या 3 वर्षांपासून प्रेम संबंध असतानाही प्रियकर लग्नासाठी नकार देत होता. त्याचाच बदला घेण्यासाठी अॅसिड हल्ला केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तरुणीने हल्ल्याच्या दिवशी केमिकलची बाटली आपल्या पर्समध्ये ठेवली होती. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...