आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूममध्ये जाताच कपडे फाडायच्या महिला, मसाजसाठी आलेल्या तरुणांना बसायचा धक्का, मग करायच्या असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - मसाज पार्लरला जाणे ही चैनीची गोष्ट. ज्यांची आर्थिक स्थिती जरा बरी आहे असे लोकं थकवा मिटवण्यासाठी आणि रिफ्रेश होण्यासाठी मसाज घ्यायला जातात. 

तथापि, जेथे काही मसाज पार्लरमध्ये समान लिंगी व्यक्ती मसाज करतात, तेथेच काही पार्लरमध्ये मात्र भिन्न लिंगी व्यक्तीही मसाज करताना आढळत आहेत. या मसाज पार्लरच्या आडून अनेक प्रकारचे गैरव्यवहार समोर येत आहेत. अशीच एक घटना नवी दिल्लीत उघडकीस आली, ज्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. 

 

असे आहे प्रकरण

दिल्ली-एनसीआरच्या काही हॉटेल्समध्ये मसाज करताना ग्राहकांचे अश्लील फोटोज काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या पूर्ण गँगचा मुख्य आरोपी शादाब गौहर आणि त्याची प्रेयसी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

 

मसाजची द्यायचा आकर्षक जाहिरात
शादाब इंटरनेटवर मसाजची जाहिरात देऊन सामान्यांना गंडवण्याचे काम करत होता. शादाब आणि त्याच्या प्रेयसीसोबत या कामात आणखी दोन महिला साथ देत होत्या. 

 

असे करायचे ब्लॅकमेल
मसाजसाठी ग्राहकाने संपर्क साधला की, आधी त्याला एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये बोलावले जायचे. मग ठरलेल्या रूममध्ये ग्राहकाचा प्रवेश झाला की, मसाजच्या बहाण्याने ग्राहकाला विवस्त्र केले जायचे. यादरम्यान, कटानुसार एक महिला स्वत:चे कपडे फाडून मोठमोठ्याने ओरडायला लागायची. तर शादाब लपून त्या ग्राहकाचे महिलेसोबत आक्षेपार्ह फोटो काढून घ्यायचा. यानंतर ती महिला खोट्या रेप केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायची. अशा प्रकारे ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट होत होती.


असा झाला भंडाफोड
एका तरुणासोबत असाच प्रसंग झाला तेव्हा त्याने गप्प न बसता पोलिस स्टेशन गाठले. पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, शादाबने त्याला संपर्क केला आणि आपले नाव अरमान शर्मा असल्याचे सांगितले. त्याने 8 सप्टेंबर रोजी वैशालीमधील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि मसाज करण्यासाठी 12 हजार फीस मागितली. यानंतर काही दिवसांनी आरोपींनी पुन्हा संपर्क केला आणि पुन्हा हॉटेलमध्ये बोलावले. पीडित तरुणाने सांगितले की, मसाजदरम्यान त्यांनी माझे अश्लील फोटो काढले. ते दाखवून मला ब्लॅकमेल करू लागले.

 

एवढेच नाही, तेथील दोन महिलांनी पीडित तरुणाचे सर्व किमती वस्तू हिसकावून घेतल्या. मग दोन्ही महिलांनी आपले कपडे फाडले आणि मला रेपच्या खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली. त्यांनी पीडित तरुणाकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. रेपसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकण्याच्या भीतीपोटी तरुणाने त्यांना 3 लाख रुपयेही दिले. यानंतर मात्र तरुणाने थेट पोलिस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. यावर पोलिसांनी अॅक्शन घेत आरोपी शादाब आणि त्याची प्रेयसी यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...