Maharashtra Crime / मुंबईत पबजीने घेतला जीव, आईच्या मोबाईलवर पबजी खेळण्यास नकार दिल्याने लहान भावाने मोठ्या भावाला भोसकले

करणाऱ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली

दिव्य मराठी वेब

Jun 30,2019 12:56:46 PM IST

मुंबई- पबजी गेमची क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे, तसेच यामुळे अनेकजणांचे जीवही गेले आहेत. असेच एक प्रकरण मुंबईतील भिवंडीमध्ये घडली. आईच्या मोबाईलवर पब्जी गेम खेळण्यास नकार दिल्याने 15 वर्षीय अल्पवयीन भावाने आपल्या 19 वर्षीय मोठ्या भावाच्या पोटात कात्री भोसकून हत्या केली आहे. घटना शनिवार(29 जून)ला भिवंडीत घडली. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह(19) असे मृत युवकाचे नाव आहे. अल्पवयीन हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.


शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका चाळीत हे कुटुंबीय राहतात. शनिवारी सकाळी 15 वर्षीय मोहम्मद फहाद आईचा मोबाईल घेऊन त्यावर ऑनलाईन पब्जी गेम खेळत होता. गेम खेळण्यासाठी मोठा भाऊ मोहम्मद हुसैन याने मनाई करत त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतला. यामुळे राग आलेल्या लहान भावाने मोठ्या भावासोबत भांडण केले. दरम्यान भांडण सुरू असतानाच मोहम्मद फहादने घरातील कात्री घेऊन मोठ्या भावावर वार केले. यात मोठा भाऊ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शेजाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हत्या करणाऱ्या छोट्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 15 वर्षीय मोहम्मद फहाद याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.

X
COMMENT