Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | youngster killed girls father

मुलीसोबत पाहिल्याने वाद; युवकाने केली मुलीच्या पित्याची हत्या

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 11:08 AM IST

मुलीच्या चारित्र्यावर पित्याने घेतला होता संशय

  • youngster killed girls father

    नांदगाव (जि. नाशिक) - मुलीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पित्याची शेजारच्या युवकाने हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवड गावी घडली. रंजित दामू आहेर (४५) असे मृताचे, तर नागेश पवार असे मारेकऱ्याचे नाव आहे.


    रंजित यांनी त्यांच्या मुलीला शेजारच्या नागेशसोबत शुक्रवारी रात्री बघितले म्हणून मारहाण केली होती. त्यानंतर ते मुलीला घेऊन नागेशकडे गेले. त्यांच्यात वाद झाल्याने रंजितने नागेशला काठीने मारहाण केली. त्यानंतर नागेश तेथून निघून गेला. परंतु, थोड्या वेळाने कुऱ्हाड घेऊन परत येत रंजित यांच्या मानेवर घाव घातला. त्यात रंजित हे जागीच कोसळले. त्यांचा मुलगा तुषार मध्ये पडला असता नागेशने त्याच्यावरही वार केला. कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरड केल्याने नागेश पळून गेला. रंजित व तुषारला नागरिकांनी नांदगावच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी रंजित यांना मृत घोषित केले. तुषारवर मालेगावात उपचार सुरू आहे. नागेशला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Trending