आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Your Community Has Five Thousand Year Reservation, Jitendra Avad Reply To Nitin Gadkari

'तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होतं', गडकरींच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्रीय मंत्री यांच्या आरक्षणाबाबत केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माळी समाजाच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी, "बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही", असे विधान केले होते. त्यावर, "तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होतं", अशा शब्दात आव्हाडांनी प्रतिक्रीया दिली.


नागपूरमध्ये अखिल भारतीय माळी समाजाच्या महा अधिवेशनात नितीन गडकरी यांनी भाषण देत असताना, आरक्षणावर एक विधान केले. ते म्हणाले की, "बरं झालं आमच्या जातीला आरक्षण नाही, अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो. मी घरच्यांना आधीच सांगितलं होतं, मला नोकरी करणारा नव्हे तर नोकरी देणारा व्हायचं आहे", असे गडकरी म्हणाले होते. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी ही नाराजी व्यक्त करत प्रत्युत्तर दिले. आव्हाड म्हणाले, "तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्ष होतं, तेव्हा आम्ही गावकुसाबाहेर होतो." असे मत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त कले.

बातम्या आणखी आहेत...