आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपला डाटा हानीकारक ठरू शकताे!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ ओ मीठी-मीठी बातें करें', गंजापन भगाएं, बाल उगाएं', छह दिन में पेट घटाएं'- कदाचित तुमच्या फाेनवर अशा प्रकारचे मेसेज/एसएमएस येत असतात? किंवा काेणी अनाेळखी व्यक्ती एखाद्या विमानतळावर पैशाअभावी अडकून पडल्याचा संदेश कधी ईमेलवर आला असेल अथवा तत्काळ उपचारासाठी पैशाची गरज आहे, व्यक्तिगत आणि शैक्षणिक कर्ज, स्वस्तात फ्लॅट खरेदी करण्याच्या संधीची आठवण देणारा संदेश आलेला असेल. याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का, तुमच्या माेबाइलवर हे संदेश का येत असतात? 'स्पॅम' म्हणवल्या जाणाऱ्या या स्वरूपाचे मेसेज आणि ईमेल केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर जगभरातील लाेकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. जेव्हा एखाद्या लिंकवर क्लिक करता किंवा अाॅनलाइन काही वाचताना माऊस काही वेळ एखाद्या लिंकच्या जवळपास थांबवता त्या वेळी आपल्याविषयीची सारी खासगी माहिती कंपन्या नाेंदवून घेत असतात. आता प्रश्न असा पडताे की, त्याचा काय उपयाेग हाेताे? अशा पद्धतीने आपणा सर्वांविषयी मिळवलेल्या खासगी माहितीद्वारे गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांना कळून चुकते की, आपले आवडते खाद्यपदार्थ काेणते? पर्यटनाची आवड आहे का? अाॅनलाइन खरेदीत स्वारस्य आहे का? ही माहिती या कंपन्या वस्त्राेद्याेग, पुस्तके, पर्यटन, हाॅटेल अशा निरनिराळ्या क्षेत्रातील उद्याेगांना विकतात, जेणेकरून त्यांच्या जाहिराती याेग्य व्यक्तीपर्यंत त्यांना पाेहोचवता येतात. इंटरनेटवर जेव्हा एखादी व्यक्ती गराेदरपणाविषयी माहिती सर्च करीत असते तेव्हा कंपनी असा अंदाज लावत असते की एकतर यास मूल व्हायचे आहे किंवा मूल जन्मास येणार आहे. संबंधित व्यक्तीस फर्टिलिटी क्लिनिक आणि मुलांच्या अावश्यक गरजांच्या जाहिरातींचा मारा सुरू हाेताे. उदा. खेळणीच्या वस्तू, मुलांच्या पालनपाेषणाची माहिती इ. यास 'टार्गेटेड अॅडव्हर्टायझिंग' म्हटले जाते. आता ही बाब निराळी की, काही जाहिराती चुकीच्या व्यक्तीपर्यंत पाेहाेचत असतात. एखाद्यास वजन कमी करण्याची गरज नसते किंवा डाेक्यावरचे केस झडत नसतात, टक्कल खिजवत नसते तरीही याविषयीच्या जाहिराती बिनधाेक माेबाइलवर येत असतात. जेव्हा गुगलवर एखादी बाब सर्च करता- उदा. लॅपटाॅप किंवा एखादी कादंबरी. त्यानंतर काही दिवस अन्य वेबसाइटवरदेखील बाजूला लॅपटाॅप, कादंबऱ्यांची जाहिरात झळकत असते. हा टार्गेटेड अॅडव्हर्टायझिंगचाच परिणाम अाहे. एका मर्यादेपर्यंत ही बाब सुविधाजनक ठरते, कदाचित या माध्यमातून बिल्कुल सही लॅपटाॅप मिळू शकेलही, परंतु या प्रकारच्या जाहिरातबाजीची दुसरी बाजूदेखील आहे. कदाचित तुम्ही गरजेपेक्षा अधिक खरेदी कराल. या तंत्रामुळे कंपन्या किमती वाढवू शकतात, उदा. विमानांची तिकिटे. जर तुम्हाला संबंधित मार्गावरून जाणे अपरिहार्य असेल तर कंपन्या लगेच तिकीट दर वाढवतात. खासगीपण काही राहिलेले नसते. या साऱ्यांसाठी 'कुकीज'चा वापर केला जाताे. जर एखाद्या आजाराविषयी माहिती सर्च करीत असाल तर हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांकडे ती माहिती पुरवली जाते, मग या कंपन्या पाॅलिसीसाठी तगादा लावतात. कदाचित यामुळे प्रीमियम जादा मागितला जाऊ शकताे. कारण स्वत:ला आजारापासून असुरक्षित समजत असता. प्रश्न केवळ इंटरनेटचाच नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक बाबींमध्ये डिजिटल हस्तक्षेप वाढत चालला आहे, तसे खासगी बाबी जगाच्या चव्हाट्यावर येत आहेत. याशिवाय डेटाचा विषारी पद्धतीने आणि हानिकारक वापर वाढला आहे. पूर्वी बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या जात आता लाेक माेबाइल, टीव्हीवर पाहतात आणि वाचतात. अाॅनलाइन बातम्यांचे सारेच स्रोत तुमचा आवडीचा विषय माॅनिटर करीत असतात. त्यानुसार बातम्या 'अाॅटाे सजेस्ट' केल्या जातात. ही बाब सुविधाजनक असली तरी मात्र मुद्द्यांविषयी आपली जाण वाढवणे, जगभरातील घडामाेडी समजून घेणे हा बातमीमागचा मूळ हेतू बाजूला पडत आहेे. 'अाॅटाे सजेस्ट' बातम्यांमध्ये गुंतून राहाल तर डबक्यातील बेडकासारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. हातात वर्तमानपत्र घेतल्याने अावडीचे विषय तर वाचले जातातच, शिवाय आवडीच्या नसलेल्या विषयांची प्राथमिक जाण तरी हाेते, किमान त्याकडे लक्ष तरी जाते. 'अाॅटाे सजेस्ट' बातम्यांत ही सुविधा नाही. माेबाइल नंबर, ईमेल आयडी, आईचे आडनाव, जन्म दिनांक, घराचा पत्ता अशा अनेक खासगी बाबी आपण माेबाइलवर, इंटरनेटवर शेअर करत असताे. माॅलमध्ये शाॅपिंगला जाता तेव्हा पार्किंगच्या जागेवर माेबाइल नंबर मागितला जाताे. कारण त्यासाठी माेठी बाजारपेठ तयार झाली आहे. ज्यामुळे 'मीठी-मीठी बातें' करण्याचे निमंत्रणही मिळते. डेटाच्या माध्यमातून लाेकांचा पैसा चाेरला जाताे, ज्यास 'फिशिंग अटॅक' किंवा 'आयडेंटिटी फ्राॅड' म्हटले जाते. जगभरात आजकाल डिजिटल विश्वाचा डंका वाजत असला तरी एक बाब निश्चित लक्षात घेतली पाहिजे की, सावधगिरी बाळगली नाही तर गरीब, अशिक्षित वर्गाचे नुकसान आणि सक्षम डेटा कंपन्यांचा फायदाच फायदा हाेत आहे. रीतिका खेरा अर्थतज्ञ, एसोसिएट प्रोफेसर (आयआयएम)