आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पूर्वीपेक्षाही अधिक सुऱक्षित होत आहे तुमचे डेबिट-क्रेडिट कार्ड, जाणून घ्या कसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रेडिट आणि डेबिट कार्डबाबतच्या सुरक्षेसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.  बँकेने नुकतेच दिशानिर्देश जारी केले आहेत. दिशानिर्देशच्या मते, कार्डने होणाऱ्या व्यवहारातील सुरक्षला आणखी सुऱक्षित करण्यासाठी नवी टोकन व्यवस्था जारी केली आहे. या व्यवस्थेअंतर्गत वास्तविक तपशीलाला एक विशेष कोड टोकनने बदलण्यात येणार आहे. पॉईंट ऑफ सेल (PoS) टर्मिनल्स, क्विक रिस्पाँस (QR) कोडसहित देय देण्यासाठी कार्डच्या तपशीलाच्या एका स्थानावर टोकनचा वापर करण्यात येणार आहे. या टोकन सिस्टममुळे पेमेंट सिस्टमला सुऱक्षित करणार आहे. ही व्यवस्था लागू झाल्यानंतर पेमेंट कंपन्या थर्ड पार्टीसोबत मिळून आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी टोकन जारी करणार आहेत. कार्डमध्ये वाढणाऱ्या घोटाळ्यामुळे आरबीआयने ही गाईडलाइन निश्चित केली आहे. 

 

मोबाइल फोन आणि टॅबलेटच्या माध्यमातून उपलब्ध होणार टोकन सुविधा

आरबीआयने सांगितले की, सध्या मोबाइल फोन आणि टॅबलेटचवर टोकन कार्डने व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याच्या मिळालेल्या अनुभवानंतर इतर डिवाइसेजवर त्याचा वापर करण्यात येणार आहे. बँकेने पुढे सांगितले की, कार्डचे टोकनायझेशन आणि टोकन व्यवस्थेपासून वेगळे व्हायचे काम फक्त अधिकृत कार्ड नेटवर्कद्वारे करण्यात येईल. ही व्यवस्था सुरु झाल्यानंतर कार्ड धारकाला इतर थर्ड पार्टी अॅपला आपल्या कार्डची डिटेल द्यावी लागणार नाही. याआधी असे केल्यामुळे युझरला कार्डचा डेटा थर्ड पार्टी अॅप्सच्या वेबसाइट्स किंवा अॅपवर सेव्ह करावा लागत होता. यामुळे डेटा चोरी होण्याची भीती होती. 

 

आणखी माहितीसाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा......

बातम्या आणखी आहेत...