आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधी तुमची मुलगी होऊ शकते कोट्याधिश, 14 वर्षांपर्यंत करावी लागेल गुंतवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत सरकारच्या एका योजनेअंतर्गत तुमची मुलगी कोट्याधिश होऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाउंट उघडावे लागेल. तुम्ही हे अकाउंट जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडु शकता. या योजनत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नसते.

 

किती गुंतवणूक करावी लागते

> तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये 14 वर्षांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर हे अकाउंट मॅच्युअर होते. या अकाउंटमध्ये जमा रकमेवर मुलीचे लग्न झाल्यानंतरही व्याज मिळत राहते. उदाहरणादाखल मुलगी 1 वर्षाची असताना तिचे सुकन्या समृद्धी अकाउंट उघडले आणि 14 वर्षांपर्यंत दरमहिन्याला 12,500 रुपये गुंतवणूक केली तर आजच्या व्याजाप्रमाणे मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर तिच्या अकाउंटमध्ये 77,99,280 रुपये जमा होतात. 

 

मुलगी 25 वर्षांची असताना होईल कोट्याधिश

> 25 वर्षांपर्यंत मुलीचे लग्न झाले नाही तर तिला जमा रकमेवर व्याज मिळत राहील. मुलगी 25 वर्षांची असताना तिच्या अकाउंटमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा होते. तुम्ही 14 वर्षांच्या आत सुकन्या समृद्धी अकाउंट उघडुन 21 लाखांची गुंतवणूक केली तर तुमच्या मुलीला 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम मिळते.

 

सध्यस्थितीला वार्षिक व्याजदर आहे 8.5% 

> सध्यस्थितीला सुकन्या समृद्धी योजनत वार्षिक व्याजदर 8.5% आहे. केंद्र सरकार दर तीन महिन्याला या योजनेवर मिळणाऱ्या व्याजाचे परिक्षण करते. या योजनेअंतर्गत अकाउंटमध्ये एका वर्षात 1.5 लाखापर्यंत गुंतवणूक करु शकतात. 1 ते 10 वर्षांपर्यंत मुलीच्या नावे हे सुकन्या समृद्धी अकाउंट उघडता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...