आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी नुकसानदायी ठरु शकतात तुमची लांब नखे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लांब नखे वाढवायला सर्वांनाच खूप आवडते, परंतु सत्यता ही आहे की, वाढलेल्या लांब नखांमुळे तुमच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. 

कॅरोटिनपासून बनतात नखे - नखे शरीरात असणाऱ्या कॅरोटिन नावाच्या घटकापासून बनलेले असतात. ज्या वेळी शरीरात य घटकाची कमतरता असते तेव्हा नखांच्या पृष्ठभागावर याचा परिणाम होण्यास सुरुवात होते. यामुळे नखांचा रंग बदलतो, जो कधी कधी गंभीर आजाराचादेखील संकेत देतो.

होऊ शकतो संसर्ग - जर तुमची नखे लांब असतील आणि तुम्ही दिवसभरात बरेचदा स्वच्छ करत असाल तरीही संसर्ग होण्याची शक्यता असतेच. लांब नखांमध्ये पिनवर्म्स जमा होऊ शकतात. शिवाय त्यात जास्त घाण आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळे संसर्ग निर्माण होऊ शकतो.

उलट्या आणि अतिसार - नखांमध्ये आढळणारे बॅक्टेरिया अन्नाद्वारे पोटात जातात, ज्यामुळे उलट्या आणि अतिसार होऊ शकतो. जर तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय असेल तर त्यामागील कारणे ओळखा. कित्येकदा असे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते.

गरोदरपणात लक्ष द्या - गरोदरपणात नखे खूप वेगाने वाढतात, परंतु यादरम्यान नखे पातळ आणि नाजूक होतात. जे कोणत्याही वस्तूंमध्ये अडकू शकतात. नखे जास्त लांब ठेवू नका नाहीतर आई आणि गर्भात वाढणाऱ्या बाळालाही नुकसान होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...