आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपला फाेन असेल साऱ्या गॅजेटचा सरदार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक तैलंग

नव्या दशकात अापणास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक उत्तुंग कामगिरी पाहायला मिळतील, ज्याची सुरुवात यावर्षी हाेऊ जात अाहे. अागामी १० वर्षे '5जी'चे प्रस्थ असेल. या तंत्रामुळे खऱ्या क्रांतीची सुरुवात हाेईल. बहुतेक तंत्रज्ञान कंपन्या '5जी'च्या प्रतीक्षेत अाहेत. मग ती कंपनी स्मार्टफाेन बनवणारी असेल किंवा गेमिंग अथवा व्हिडिअाे स्ट्रिमिंग सर्व्हिस पुरवणारी असेल. '5जी'मुळे स्मार्ट फाेन वापरण्याची अापली पद्धत बदलेल. प्रत्येक वेळी फाेन खिशात बाळगण्याची गरज असणार नाही. त्याच्या अॅसेसरीजला इतके बळ मिळेल की, स्मार्टफाेन हाताशी न बाळगता त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करता येईल. जाॅगिंग करीत असतानाच स्मार्ट वाॅचच्या माध्यमातून काॅन्फरन्स काॅल हाेऊ शकेल. व्हाॅइस इनॅबल्ड स्मार्ट इअरफाेन/स्मार्ट स्पीकर अापल्या हातांना अन्य कामांसाठी खुले ठेवतील. '5जी'मुळे अापला फाेन साऱ्या गॅजेट्सचा सरदार बनेल. एका टच किंवा व्हाॅइस कमांडने अापला फाेन घरातील सर्व इलेक्ट्राॅनिक गॅजेट नियंत्रित करेल. तात्पर्य टीव्ही, एसी, घरातील सुरक्षा यंत्रणा ताे नियंत्रित करेल. अापल्या बाजारपेठेत असे गॅजेट अालेले अाहेत, येत्या वर्षात ते अाणखी स्वस्त हाेतील अाणि लवकरच घराेघरी दाखल झालेले असतील. मात्र त्यास खरी ताकद '5जी'मुळेच मिळालेली असेल.

'पब्जी' एक सुरुवात अाहे


२०१९ मध्ये अापण माेबाइल गेमिंगचा वाढता प्रभाव पाहिला. प्रत्येक गल्ली-रस्त्यावर पब्जी खेळणारे पाहिले. ही एक सुरुवात हाेती. मात्र स्वस्त अाणि वेगवान इंटरनेट एकीकडे मल्टिलेयर अाॅनलाइन गेमिंगचा विस्तार तर करेलच, शिवाय गुगल स्टेडिया, अॅपल अार्केडसारखे प्लॅटफाॅर्म प्राेफेशनल गेमिंग घराेघरी घेऊन जातील. उच्च दर्जाचे अप्रतिम ग्राफिक्स असलेले गेम खेळण्यासाठी महागडे फाेन किंवा गेमिंग कन्साेल नव्याने घेण्याची गरज भासणार नाही.

गेमिंगमध्ये वापरण्यात येणारे सारे हाय एंड कम्प्युटेशन दूरवर असलेल्या गुगल किंवा मायक्राेसाॅफ्टसारख्या कंपनीच्या क्लाऊड सर्व्हरवर असेल अाणि अापण हजाराे मैल दूर बसून अापल्या फाेन किंवा गेमिंंग कंट्राेलरवर केवळ गेमचा अानंद लुटू शकू, तेदेखील अापले मित्र अाणि अाॅनलाइन गेमिंग बडीजच्या साथीने. बहुधा येत्या सप्टेंबरपर्यंत भारतात हे तंत्रज्ञान लाँच हाेऊ शकेल. अॅपल अार्केड तर उपलब्ध झाले अाहे, परंतु अॅपलपुरतीच त्याची उपयुक्तता अाहे. गुगल स्टेडिया भारतात लाँच हाेण्यास थाेडा वेळ लागू शकताे.

टीव्ही परत येणार


स्मार्टफाेन अाणि टॅब्लेट अाल्यानंतर जे लाेक टीव्हीचे तेरावे घालत हाेते ताे टीव्ही अाता नव्या दमाने जबरदस्त पुनरागमन करणार अाहे. स्मार्टफाेन बनवणाऱ्या शाअाेमी, वन प्लस, नाेकिया अाणि माेटाेराेलासारख्या ढीगभर कंपन्या टीव्हीच्या निर्मितीत व्यग्र अाहेत ही बाब या अनुषंगाने माेठा पुरावा ठरावा. मात्र हा नवा टीव्ही 'इडियट बाॅक्स' असणार नाही, तर ताे स्मार्ट असेल. यावर वेगवान इंटरनेटच्या मदतीने अाॅनलाइन स्ट्रिमिंग सेवांचा वापर करता येईल. देशातील, जगभरातील प्रसिद्ध चित्रपट, टीव्ही मालिका, वृत्तचित्र प्रत्येकाला अापल्या भाषेत मिळतील. इतकेच नव्हे, तर या स्मार्ट टीव्हीच्या मदतीने साेशल नेटवर्किंग, व्हिडिअाे काॅन्फरन्ससाेबतच मल्टिप्लेयर अाॅनलाइन गेमिंगची सुविधादेखील असेल. स्वस्त अाणि सुंदर स्मार्ट टीव्हीची गर्दी यावर्षी पाहायला मिळणार अााहे. २०२० अखेरीस भारतीय बाजारपेठेत अाॅनलाइन व्हिडिअाे स्ट्रिमिंग सेवेची बहार येणार अाहे. यामध्ये डिस्नेसारख्या कंपन्या सहभागी असतील.

उलटा-पालटा फाेन


सध्या फाेल्डिंग गॅजेटच्या पर्वास सुरुवात झाली अाहे, परंतु २०१९ मध्ये गॅलेक्सी फाेल्ड किंवा माेटाे रेजरसारखे फाेल्डिंग डिव्हाइस पाहिले असे म्हणणे म्हणजे धाडसाचेच ठरेल. २०२० मध्ये ही उपकरणे पाहायला मिळतील. फाेल्डिंग स्क्रीनचा फायदा हा असताे की, माेठी स्क्रीन लहानशी करून खिशात ठेवता येऊ शकते, लॅपटाॅप बॅॅगमध्ये ६५ इंची टीव्ही घेऊन फिरता येऊ शकते. मात्र सध्या यामध्ये प्लास्टिक स्क्रीनचा वापर केला जाताे. त्यामुळे ही स्क्रीन कमी चमकदार अाणि कमी टच रिस्पाॅन्सिव्ह असते. एक मात्र निश्चित की, नजीकच्या भविष्यात फाेल्डेबल स्क्रीन अनेक गॅजेटमध्ये वापरली जाईल अाणि २०२० मध्ये या गॅजेटमध्ये बऱ्याचशा सुधारणा पाहायला मिळतील. सामान्य लाेकांपर्यंत ते पाेहाेचण्यास किमान २-३ वर्षे लागतील.

माझा अावाज, माझी अाेळख


अॅमेझाॅनच्या अलेक्सा डिव्हाइसप्रमाणेच अशा स्वरूपाच्या गॅजेट्सची २०१९ मध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली. व्हाइस कमांडच्या माध्यमातून अनेक कामे केली गेली. २०२० मध्ये ते सुरूच राहील. ही कॅटेगरी सर्वात वेगाने विस्तारत चालली अाहे. तुमच्या व्हाइस कमांडद्वारे केवळ गाणी एेकवणे, वेळ सांगणे यापलीकडे जाऊन विजेचे दिवे, एसी, फ्रिजदेखील अॅलेक्सा नियंत्रण करते. अाता हे व्हाॅइस असिस्टंट हिंदी भाषा समजू शकतात अाणि हिंदीतून संवाद साधू शकतात. २०२० अाणि भविष्यात व्हाॅइस असिस्टंट अापल्या साऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनेल.

अभिषेक तैलंग टेक गुरू
 

बातम्या आणखी आहेत...