आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकतर्फी प्रेमातून युवतीचा विनयभंग, चार आरोपींवर गुन्हा दाखल; चौघेही फरार

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

लातूर - एकतर्फी प्रेमातून हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जाळण्याची घटना ताजी असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील अंधारी येथेही एका महिलेस घरात घुसून पेटवून दिल्याची घटना घडली. आता काही सडकछाप मजनूंनी एका अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग केल्याची घटना जळकाेट तालुक्यातील केकतसिंगी येथे घडली. एकूणच राेडराेमिओ उदंड झाल्याचे चित्र बघावयास मिळत असून अशा घटनांना पायबंद घालण्याची मागणी जाेर धरत आहे. 

दरम्यान, गावातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा रस्ता अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध जळकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार केकतसिंदगी (ता.जळकोट ) येथे बुधवारी सायंकाळी घडला. चारही आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की केकतसिदंगी (ता.जळकोट ) येथील इयत्ता नववीत शिकत असलेली एक चौदा वर्षीय मुलगी गावातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी जात होती. त्याच वेळी सचिन कोंडिबा मुंडे याने तिचा रस्ता अडवून विनयभंग केला. त्यावेळी ‘तू सचिनसोबत प्रेम करते अशी कबूली दे’ म्हणत बालाजी रामचंद्र केंद्रे, शुभम अशोक केंद्रे आणि नामदेव किशन जायभाये या तिघांनी तिला जबरदस्ती केली. पीडित मुलीने हा प्रकार घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी चार आरोपींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली.