आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास केली अटक; एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात सद‌्गुरूनगर भागात पिस्तूल व तीन जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतले. पिस्तूल जप्त करून त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


ज्ञानेश उर्फ सोनू रत्नाकर मोरे (वय ३१, रा. सद््गरुनगर) असे संशयिताचे नाव आहे. तो सद््गुरूनगरात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक मनोहर देशमुख, रामचंद्र बोरसे, अनिल इंगळे, विनाद पाटील, संजय सपकाळे, रवींद्र गायकवाड, किरण चौधरी, संतोष मायकल, मिलिंद सोनवणे व शरद भालेराव यांचे पथक तयार करुन सद््गुरूनगर भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यात मध्यरात्री ज्ञानेश हा संशयितरीत्या फिरताना दिसून आला. चौकशी केली असता त्याच्याकडे पिस्तुल अाढळून अाले. 

बातम्या आणखी आहेत...