आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न, प्रजासत्ताक भारत पक्षाचा कार्यकत्याने मारली उडी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मंत्रालयात आत्महत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. सोमवारी एका तरुणाने 6व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्रालय परिसरात जाळी लावण्यात आल्याने सुदैवाने तरुण थोडक्यात बचावला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. लक्ष्मण चव्हाण असे या तरुणाचे नाव असून तो पुणे येथील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
 
लक्ष्मण चव्हाण याने पोलिसांना सांगितले की, तो 'भारत प्रजासत्ता' या संघटनेचा कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हा सुशिक्षित बेरोजगार आहे. राज्याला एका महिला मुख्यमंत्री हवा आहे, अशी लक्ष्मणची मागणी आहे. या मागणीसाठी लक्ष्मण याने आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

दरम्यान, यापूर्वी जानेवारी 2018 मध्ये शेतकरी धर्मा पाटील यांची विखरण (ता. शिंदखेडा, जि. धुळे) या 80 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.