Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | youth beatain in oner side love

युवतीचा पाठलाग करत भावाला केली बेदम मारहाण; एकतर्फी प्रेमातून कृत्य

प्रतिनिधी | Update - Sep 03, 2018, 10:15 AM IST

एकतर्फी प्रेमातून युवतीचा पाठलाग करत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला हटकणाऱ्या भावाला संशयिताने

  • youth beatain in oner side love

    नाशिक- एकतर्फी प्रेमातून युवतीचा पाठलाग करत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोडरोमिओला हटकणाऱ्या भावाला संशयिताने बेदम मारहाण केली. एक्स्लाे पॉइंट, अंबड येथे हा प्रकार घडला. संशयिताच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    पोलिसांनी दिलेली माहिती व पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, एक्स्लाे पॉइंट येथे कंपनी सुटल्यानंतर घरी पायी जात असतांना संशयित सुशील भागवत प्रसाद यादव ( रा. पाथर्डी फाटा) याने दुचाकीवरून ( एमएच १५ एवाय १८८५) घरापर्यंत पाठलाग केला. 'तू मला बघत होतीस,' असे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. युवतीने आरडाओरड केल्यानंतर तिचा भाऊ बाहेर आला. त्याने संशयिताला जाब विचारला असता संशयित रोडरोमिओने त्यालाच बेदम मारहाण केली. गर्दी झाल्यानंतर त्याने तेथून पलायन केले. युवतीने पोलिसांत तक्रार दिली. संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Trending