आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर रॉकेल ओतून घेत तरुणाने पोलिस ठाण्यासमोर जाळून घेतले; ९०% भाजला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर पोलिस ठाण्यासमोर झालेली बघ्यांची गर्दी. - Divya Marathi
घटनेनंतर पोलिस ठाण्यासमोर झालेली बघ्यांची गर्दी.

हिमायतनगर -  शहरातील शे. सद्दाम शे. अहेमद नामक २५ वर्षीय युवकाने पोलिस ठाण्यासमोरच अंगावर रॉकेल टाकून  काडी लावून पेटवून घेतल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.   पती -पत्नीतील वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


शेख सद्दाम याने जाळून घेतले तेव्हा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी एस. एस. पवार, जाधव आदींनी पांघरायचे साहित्य त्याच्या अंगावर टाकून आग विझवत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस कर्मचारी पवार यांचाही हात भाजला तर सदर युवक ९० टक्के भाजला असून मृत्यूशी झुंज देत आहे.हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला नांदेडला रेफर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र बोरसे हे करीत आहेत.