आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरी मिळत नसल्याने अासाेद्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले तरी नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 


हितेंद्र विलास महाजन (वय २२, रा. अासोदा) असे मृत अभियंता तरुणाचे नाव आहे. हितेंद्र याने शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. वडील विलास महाजन हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. तर आई वैशाली ह्या शेतीकाम करीत आहेत. दरम्यान, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हितेंद्र याने काही महिने खासगी कंपनीत नोकरी केली. तो चांगल्या कंपनीत नोकरीच्या शोधात होता. गेल्या आठवड्यात तो त्यासाठी पुण्यात गेला होता; पण तेथे अपयश आल्याने पुन्हा गावी परतला. बुधवारी दुपारी तो घराच्या मागच्या खोलीत एकटाच होता. आई पुढच्या खोलीत होती. दुपारी ३.३० वाजता आईने आवाज दिल्यानंतर प्रतिसाद न आल्यामुळे तिने हितेंद्रच्या खोलीकडे जाऊन पाहिले. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. आईने आक्रोश केल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. काही जणांनी त्याला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. 


हितेंद्र हा महाजन दाम्पत्याचा एकुलता मुलगा होता. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यामुळे त्याला चांगल्या नोकरीची अपेक्षा होती. परंतु, त्यास नोकरी मिळण्यास उशीर होत होता. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. या वेळी रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...