आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण: ‘मी समाजासाठी चाललो’ चिठ्ठीत लिहून अंबडच्या तरूणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड- मराठा समाजाने ५८ मूक मोर्चे काढले. त्यानंतर आंदोलने केले. तरीपण सरकारला जाग आली नाही. माझ्या मुलीच्या भविष्यासाठी मी माझा पण जीव देत आहे. दादा व बाई मी गेल्याने दु:ख मानून मनात ठेवू नका, मी समाजासाठी चाललो आहे, असे चिठ्ठीत लिहून अंबड तालुक्यातील चिकणगाव येथील मराठा तरुण सुनील खांडेभराड (२५) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. 
  

सुनील हा मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. गेल्या आठ  दिवसांपासून मराठा आरक्षणाबद्दल बोलत होता. त्याने रविवारी सकाळी नऊ वाजता विष प्राशन केले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...