आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रासोबत लग्न करण्यासाठी मुलाचा झाला मुलगी, पण लग्नानंतर घडले असे काही.....की त्याने केली गळफास घेऊन केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जमशेदपूर : आदित्यपूर येथील एका युवकाचे दुसऱ्या युवकावर प्रेम जडले होते. पण दोघे समलैंगिक असल्यामुळे त्यांच्या लग्नात अडचण येत होती. अशात त्याने दोन महिन्यांपूर्वी प्लास्टिक सर्जरी करून लिंग परिवर्तन केले आणि त्याने आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. लग्नाच्या दिवसांतच त्याच्या कथित पतीने पैसे कमविण्यासाठी शिवीगाळ आणि मारहाण करत त्याच्यावर दबाव टाकत होता. या त्रासाला कंटाळून त्याने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. 


प्रेमासाठी राजू झाला होता छोटी

आदित्यपूर येथील राजू कुमार ऊर्फ छोटी (22 वर्ष) प्लास्टिक सर्जरी करून युवकाचा युवती झाला होता. त्याने मोठ्या आशेने अमन सिंह (24 वर्ष) सोबत लग्न केले होते. पण छोटीने शुक्रवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. अमन सिंह राजूला मारहाण करत होता. अमनच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे राजूच्या कुटुंबीयांनी सांगितले. 


राजूच्या छोटी बनण्याचा झाला शेवट

बिरसानगर पोलिसांना सांगितले की, लग्नानंतर दोघेही आपल्या परिवारापासून वेगळे बिरसानगर झोन क्रमांक 4 मध्ये राहत होते. शुक्रवारी रात्री 9 वाजता दोघेही सोबतच घरी परतले होते. अमन सिंह पत्नीसाठी औषधी आणायाचे सांगून घरातून बाहेर पडला. तो 10 मिनिटांनी परत आला तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने छोटीला आवाज दिला. आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने अमनने शेजारील लोकांना सांगितले. लोकांनी दरवाजा उघडला असता राजू फासावर लटकलेला होता. शेजाऱ्यांनी त्याला रूग्णालयात दाखले केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. राजू नेहमीच किन्नरांसोबत राहत होता. त्याच्या मृत्यू बातमी कळताच शनिवारी सकाळी बिरसानगर पोलिस ठाण्यात मोठ्या संख्येने किन्नर पोहोचले आणि त्यांनी आरोपी अमन सिंह विरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीवरून गदारोळ घातला होता. 


लग्नानंतर पती करत होता छळ  
घटनेची माहिती मिळताच राजूच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी अमनवर छळ करण्याचा आरोप लावला. दरम्यान पिता दानेसर गोड़सोरा यांच्या फिर्यादीवरून अमन सिहं विरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी केस नोंद केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

 

वडील म्हणाले - किन्नरांच्या सांगण्यावरून राजू बनला छोटी

राजूचे वडील दानेसर गोड़सोरा यांनी सांगितले की, राजूमध्ये लहानपणापासूनच मुलींचे गुण होते. काही दिवसांपूर्वीच तो अमन आणि किन्नरांच्या संपर्कात आला होता. त्यांच्या बोलण्याला बळी पडून त्याने प्लास्टिक सर्जरी करून लिंग परिवर्तन केले आणि बिरसानगर येथील अमन सिंहसोबत लग्न केले. लग्नानंतर अमन राजूचा शिवीगाळ आणि मारहाण करत छळ करत होता. त्याच्यावर पैसे कमवण्याचा दबाव टाकत होता. त्याच्या जाचाला कंटाळून राजूने आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...