आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक लाइव्ह करत युवकाने केली आत्महत्या; बहीण-भाऊ आणि मेहूण्यावर छळत असल्याचा केला आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - येथे एका युवकाने फेसबुक लाइव्ह करत आपल्या अडचणींचा पाढा वाचला. यानंतर त्याने विष प्राशन करत आत्महत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुखविंद्र सिंह असे या युवकाचे नाव आहे. 

 

कुटुंबीय आणि पोलिसांवर केले आरोप

सुखविंद्र सोमवारी सकाळी फेसबुकवर लाइव्ह आला. कुटुंबीयांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे तो म्हणाला. सुखविंद्रने वडील, भाऊ, बहीण आणि मेहूणा हे मला छळत असल्याचा आरोप केला. यानंतर पोलिसांनी देखील कुटुंबीयांवर कारवाई न केल्याचे तो म्हणाला. आपल्या अडचणींचा पाढा वाचल्यानंतर त्याने आपले जीवन संपवले. 


यानंतर संबंधित पोलिस स्टेशनमधील पोलिसांनी घटनास्थळी पोहचत सुखविंद्रच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टमला पाठवत आत्महत्याच्या आरोपाचा तपास सुरु केला आहे.