आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक करत होता विनवणी, छातीत दुखतंय पण तरीही पोलिसांनी सुरु ठेवली मारहाण; अखेर झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ (मध्य प्रदेश) - बैरागड पोलिस कस्टडीत मंगळवारी रात्री प्रॉपर्टी डीलर शिवम मिश्रा यांचा मृत्यू झाला. शिवम आपला मित्र गोविंद पोरिलसोबत जेवणासाठी ढाब्यावर जात होते. दरम्यान बीआरटी कॉरिडोरमध्ये त्यांची एसयूव्ही रेलिंगवर धडकली. यामुळे पोलिसांनी दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलिसांना येथे दोघांना जबर मारहाण केली. या मारहाणीत शिवमचा मृत्यू झाला. बैरागड टीआयसह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

 

गोविंदने सांगितले की, मी आणि शिवम ढाब्यावर जेवण करण्यासाठी जात होतो. लालघाडीच्या पुढे बीआरटी कॉरिडोरमध्ये एसयूव्ही रेलिंगवर धडकली. पोलिसांनी आम्हाला बळजबरीने पोलिस ठाण्यात आणले आणि जबर मारहाण केली. त्यानंतर बैरागड पोलिस ठाण्यात नेले. तेथे पुन्हा आम्हाला मारहाण केली. मारहाणीदरम्यान शिवमच्या छातीत दुखत होते. त्याने तसे सांगितले सुद्धा होते. पण त्याचे कोणाही ऐकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...