आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँडच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्यांनो सावधान! मिरवणुकीत नाचताना डोक्यावर पडून तरुणाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल- किनगाव येथे बँडच्या तालावर बेभान होऊन थिरकताना तोल जाऊन डोक्यावर पडून एका तरुणाला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. चेतन शरद पाटील (वय-28) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (ता.24) रात्री गावातून संदलची मिरवणूक काढण्यात आली होती. चेतन हा त्याच्या मित्रासोबत मिरवणुकीत नाचत होता. नाचताना तोल जाऊन तो डोक्यावर पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊ म्हणत तो घरी गेला. मात्र रात्रीच त्याचा मृत्यू झाला.


किनगावात सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत विविध प्रकारचे वाद्यवृंद बँडपथक सहभागी झाले होते. त्यात रात्री बँडच्या तालावर चेतन पाटील नाचत होता. तोल जाऊन तो डोक्यावर पडला. त्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली व रक्तस्रावही झाला. मात्र घरी गेल्यावर खूप रात्र झाल्याने सकाळी दवाखान्यात जाईल, असे सांगून तो झोपी गेला. दरम्यान सकाळी पत्नी त्याला उठवायला गेली असता तो मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
 
किराणा दुकानात काम करून भागवायचा चरितार्थ
चेतन हा गावातील एका किराणा दुकानावर काम करत होता. चेतनच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजता शोकाकूल वातावणात चेतनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

बातम्या आणखी आहेत...