Maharashtra Rain / चंद्रपुरमध्ये अती धाडस तरुणाला जीवावर बेतले, पाण्याखाली गेलेल्या पुलावरुन जाताना कारसह तरुण गेला वाहून

पाण्यामुळे मागील एका आठवड्यापासून हा पुल बंद करण्यात आला होता

दिव्य मराठी

Aug 06,2019 05:35:00 PM IST

चंद्रपूर- सध्या महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, यामुळे नदीवर असलेले अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रशानाने अशा अनेक धोकादायक पुलावरुन न जाण्यास सांगितले आहे. चंद्रपूरातही मुसळधार पावसाने नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडलीये. चंद्रपुरमधील इरई नदीत एक तरुण कारसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरज बिपटे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.


सुरज बिपडे हा भटाळी येथील कोळसा खाणीत काम करत होता. आज(मंगळवार) सकाळी शिफ्ट संपल्यानंतर तो आपल्या घरी येण्यासाठी कारने निघाला. घरी येताना त्याला त्याला भटाळी गावाजवळील नदीवरील पुलावरुन जावे लागणार होते. या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने तसेच नदीतील पाण्याची पातळीही वाढल्याने पुलावरुन पाणी जात होते. या पाण्यामुळे मागील एका आठवड्यापासून हा पुल बंद करण्यात आला होता. असे असताना या तरुणाने अति धाडस करत पुलावरुन गाडी नेली. यावेळी पाण्याच्या दबावाने तरुण गाडीसह वाहून गेला. सध्या प्रशासन तरुणाचा शोध घेत आहे. प्रशासनाने अनेकवेळा नागरिकांना धोकादायक पुलावरुन किंवा पूर सदृष्य भागात न जाण्याचा इशारा दिला आहे.

X