Home | Maharashtra | Mumbai | Youth fall from high building while taking Selfie, video shared by mumbai police

सेल्फीचा नाद जिव्हारी; बहुमजली इमारतीवरून सेल्फी घेताना कोसळून तरुणाचा मृत्यू, मुंबई पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 02, 2019, 03:25 PM IST

सेल्फी किंवा फोटोमुळे आपल्या जीवावार बेतेल असे काही करू नये

 • Youth fall from high building while taking Selfie, video shared by mumbai police

  मुंबई- आतापर्यंत सेल्फिचा नाद अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. काहीना दुखापती झाल्या दतर काहीना आपला जीव गमवावा लागला आहे. कोणी पाण्यात बुडून तर कोणी इमारतीवरून पडून. असाच एक अपघात मुंबईत झाला आहे. सेल्फी घेताना तरूण इमारतीवरून खाली कोसळून मृत्यू झाल्याचा एक व्हिडिओ मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

  मुंबई पोलिसांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक तरूण उंच इमारतीच्या गच्चीवरून सेल्फी घेत आहे. सेल्फी घेण्यासाठी तो गच्चीच्या टोकावर येतो आणि गच्चीचा काही भाग तुटतो आणि त्यामुळे तो तरूण खाली कोसळतो.

  Attempt for the most daring selfie? Or just another irresponsible adventure? Whatever this was for, it clearly wasn’t worth the risk! #SafetyFirst pic.twitter.com/vzBYEZs54Y

  — Mumbai Police (@MumbaiPolice) May 2, 2019

  शेअर केलेल्या व्हिडिओसोबत पोलिसांनी कॅप्शन लिहीले आहे की,''सगळ्यात साहसी सेल्फी घेण्याचा प्रयत्न? की एक बेजबाबदार धाडस? हे जे काही झाले, ते नक्कीच इतकी मोठी जोखीम घेण्यालायक नव्हते. ''

  हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, ते अजून समोर आले नाही. पण या व्हिडिओतून मुंबईकरांसोबतच सर्वांनी धडा घेतला पाहीजे की, सेल्फी किंवा फोटोमुळे आपल्या जीवावार बेतेल असे काही करू नये.

Trending