Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | youth get 10 year imprisonment in the case of rape 

अल्पवयीन मुलीस चाकूचा धाक दाखवत अपहरण करून केले दुष्कर्म, नराधमास 10 वर्षांसाठी तुरुंगात डांबले

प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 01:13 PM IST

आरोपीने शहरातील एका अल्पवयीन मुलीस चाकू मारण्याची भीती दाखवून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून परांडा येथे नेले होते.

  • youth get 10 year imprisonment in the case of rape 

    बार्शी- अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी अजय अशोक क्षीरसागर (वय २५ रा. ढगे मळा, बार्शी) यास दोषी धरत येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एस.पाटील यांनी त्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. दोन वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल झाला.

    याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका अल्पवयीन मुलीस अजय अशोक क्षीरसागर याने दि.२२ मार्च २०१७ रोजी ती शाळेत जात असताना शाळेच्या गेटजवळून हाताला धरून चाकू मारण्याची भीती दाखवून तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून परांडा येथे नेले. तेथे चाकूने जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर दुष्कर्म केले व नंतर बार्शीत आणून सोडले. दि.२६ रोजी मुलगी तीन दिवसापासून नाराज दिसत असल्याने तिच्या आईने व मावशीने तिला विचारपूस केली असता तिने अजयने केलेल्या दुष्कर्माची माहिती दिली. त्यावरून पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अजय अशोक क्षीरसागर याच्यावर अपहरण, दुष्कर्म, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

    शहर पोलिसांनी याबाबतचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. येथील सत्र न्यायालयात यावर सुनावणी होऊन साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने आरोपीस दोषी धरत कलम ३६३ मध्ये ३ वर्षे सक्षम कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावास व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाचे कलम ४ मध्ये १० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. यामध्ये सरकारतर्फे ॲड एस.एस.महिंद्रकर, ॲड पी.बी.बोचरे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस नाईक व्ही.डी.व्हटकर यांनी काम पाहिले.

Trending